top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jul 15
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अखेरीस राज ठाकरे समस्त मीडियाला , संजय राऊत यांच्यासह समस्त उद्धव सेनेला तोंडघशी पाडले आहे. राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात मीडियाला सांगितले की मराठीचा विजय मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता. त्याचा राजकारणाशी संबंध नाही. नोव्हेंबर डिसेंबर च्या दरम्यान चित्र स्पष्ट होईल , त्यानंतर युतीच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते बघू. “ संपूर्ण मीडियाला सुपारी मिळाली असल्याने त्यांनी युती होणारच ची चर्चा रंगवली होती. उबाठा सेनेचा प्रत्येक प्रवक्ता आणि संजय राऊत हे आत्मविश्वासाने यासाठीची वातावरण निर्मिती करत होते. महाविकास आघाडीत कोंग्रेसचा प्रवेश सुद्धा मीडियात अशी बॅटिंग करूनच संजय राऊत यांनी सुकर केला होता. परंतु राज ठाकरे यांनी आपल्या सगळ्याच प्रवक्त्यांची तोंडे बंद करून ती चूक होणार नाही याची काळजी घेतली. आणि आता निःसंदिग्ध शब्दात त्यांनी उत्तर दिल्या नंतर तरी मिडियावाले पतंग उडवणार नाहीत आणि उबाठा प्रवक्ते हास्यास्पद वक्तव्य करणार नाहीत ही आशा आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

आसिम मुनीर इतक्या वेळा तोंडघशी पडल्यानंतरही अजूनही जगभरातील मुस्लिमांना हिंदुत्वाच्या विरोधात एकत्र यावं असं आवाहन करत आहे. रावळपिंडीमध्ये लष्करी कॅडेट्सना संबोधित करताना त्याने पुन्हा म्हटलं की इस्लामची लढाई हिंदुत्वाशी आहे आणि हे लपवण्याची काही गरज नाही. विश्वास बसत नसेल तर 'छांगा पीर' मुल्ला छांगुरला विचारून पाहा! भारतात गजवा ए हिंदला पुढे नेण्यासाठी त्याने 3000 मुस्लिम तरुणांना निधी दिला आहे. सर्वांना सांगितलं गेलं की हिंदू मुलींना फसवा, लव्ह जिहाद करा आणि त्यांना इस्लाम स्वीकारायला लावा. छांगुर म्हणतो की, "तरुणांनो, या उद्देशाशी जोडा, तुम्हाला जन्नत मिळेल." इस्लामचा प्रसार करण्यासाठी हे एक जिहाद आहे, ज्याचं पालन तैमूर आणि औरंगजेब यांच्या काळापासून भारतात होत आलं आहे. छांगुरचे कृत्य हे दाखवतात की त्याचा खरा उद्देश 'गजवा' आहे. “गजवा ए हिंद” हा नारा भारतात दिला गेला नाही. तो अरब देशांमध्ये दिला गेलेला नारा आहे, ज्याचा उद्देश हिंद म्हणजेच भारताला इस्लाममध्ये रूपांतरित करणे आहे. आसिम मुनीरच्या काल त्याने पुन्हा सांगितलं की हिंदू आणि हिंदुत्व यांना मूळापासून नष्ट करणे हेच गजवा ए हिंदचं अंतिम ध्येय आहे. मुनीरने म्हटलं की फक्त आम्हीच नाही, संपूर्ण इस्लामिक जगताने हे काम करायचं आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

शनिशिंगणापुर मंदिर ट्रस्ट वर अखेरीस शनि महाराज कोपले आहेत. त्यांनी केलेला अमर्यादित भ्रष्टाचार रूपी पापाचा घडा भरला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या ट्रस्टला बरखास्त केले आहे. या ट्रस्टने कोट्यवधी रुपयांचे महाघोटाळे केले आहेत. त्यांनी बोगस नोकरभरती केली होती. तब्बल 2447 कर्मचारी भरती करून त्यांच्या नावाने दरमहा मोठ्या प्रमाणात पगारवाटप झाल्याचे दाखवून पैसा हडप केला गेला. या घोटाळेबाजांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले असून या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी बाहेरील अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे. बाहेरील अधिकारी नेमण्याची गरज का आहे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितले, यापूर्वी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकार्‍यांच्या या पूर्वीच्या चौकशीत या ट्रस्टला चक्क क्लीन चिट दिली होती. याच पद्धतीने खरे तर महाराष्ट्र साहित्य परिषदेची सुद्धा चौकशी आवश्यक आहे कारण त्यांना सुद्धा धर्मादाय आयुक्त कार्यालयातील मंडळीच संरक्षण देत आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

१०० लोकांवर १२० आधार कार्ड..! बिहारमधील मुस्लिमबहुल जिल्ह्यांमधील हे धक्कादायक आकडे आहेत...! पश्चिम बंगालमध्येही हा चर्चेचा विषय ठरला आहे, जिथे ममता बॅनर्जींची सरकार आधीपासूनच आधार कार्ड निष्क्रिय करण्याच्या मुद्द्यावर केंद्राशी वाद घालत आहे. हे विरोधक आणि डाव्या विचारांच्या टोळ्यांनी आधार कार्डला नागरिकत्वाचा पुरावा बनवण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. बिहारच्या या जिल्ह्यांमध्ये १००% पेक्षा जास्त आधार सैचुरेशन हे अनेक प्रश्न उभे करतात. आधार कार्ड ही ‘एक व्यक्ती - एक कार्ड’ या तत्त्वावर आधारित असते. पण जेव्हा आकडे सांगतात की लोकसंख्येपेक्षा अधिक आधार कार्ड अस्तित्वात आहेत, तेव्हा याचा अर्थ असा होतो की डुप्लिकेट आधार कार्ड तयार केले गेलेत किंवा मग परकीय नागरिकांनाही आधार कार्ड देण्यात आलेत..!! निवडणूक आयोगाच्या बिहार मतदार पडताळणीवर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला, म्हणजेच निवडणूक आयोगाचं काम सुरूच राहणार आहे. बनावट मतदारांचा खेळ हा लोकशाहीवरचा आघात आहे! वोट जिहाद थांबवायचा असेल, तर प्रत्येकाने सजग राहिलं पाहिजे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जयशंकरजी चीनमध्ये गेले आहेत, पाच वर्षांनंतर चीनी नेत्यांसोबत बैठक होत आहे. चीनने त्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरले आहे, पण त्याचवेळी भारताला धमकीही दिली आहे. यावेळी ड्रॅगन घाबरलेला आहे कारण त्यांना समजले आहे की जयशंकरजींना हाताळणे कठीण आहे, आणि पुढे तर मोदीजी येणारच आहेत. एकीकडे चीन म्हणतो की त्यांना भारतासोबत संबंध सुधारायचे आहेत, पण दुसरीकडे अशा धमक्या दिल्या जात आहेत. त्यात दलाई लामाचा मुद्दा संपलेला नाही आणि तैवानचा वाद पुन्हा उफाळला आहे. पाकिस्तान तर थेट अमेरिकेच्या गळ्यात जाऊन बसला आहे. या सगळ्या गोष्टी एकमेकींशी जोडलेल्या आहेत. आणि जयशंकरजी यावेळी हात जोडून नव्हे, तर ताकदीच्या भूमिकेतून बोलायला आले आहेत. यावेळी पहिल्यांदाच चर्चा तो समान ताकदीच्या देशांमध्ये होत आहे. ऑपरेशन सिंदूर मधील सैन्य कौशल्याने चीन हादरला आहे. यावेळी पहिल्यांदाच चीन बॅक फुटवर आहे. त्यामुळे यावेळी चीन भारताशी शांती करार करण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे.

🔽

ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page