top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • 8 minutes ago
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पंढरपुरचा विठोबा हा कुण्या एका जातीचा, पंथाचा, पक्षाचा नाही. तो आहे लाखो वारकऱ्यांचा आणि त्याच्या कोट्यवधी भक्तांचा ! पण काहींच्या डोक्यात इतका विखार भरला होता की, त्यांनी देवाच्या वारीलाही जातीचे, राजकारणाचे आणि द्वेषाचे गालबोट लावायचे धाडस केले. त्या काळात आषाढी एकादशीला, देवेन्द्र फडणवीसांना विठोबाच्या पूजेसाठी पंढरपुरात यायला विरोध करण्यात आला. काही नक्षलविचारांच्या, जातीवादी विकृतांच्या टोळक्यांनी धमक्या दिल्या होत्या की वारीत साप सोडू, गोंधळ घालू. नुसता गोंधळ नाही तर जीवघेणा गोंधळ माजवू ! देवेन्द्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. त्यांनी परिपक्व भूमिका स्वीकारून दर्शनाला जाणार नाही असे घोषित केले. विठोबाने आज स्वतः फडणवीसांना बोलावून घेतलं. विठोबाच्या मूर्तीपुढे देवेन्द्र फडणवीस आले, पूजा केली आणि नतमस्तक झाले. आज वारकरीही सुरक्षित आहेत आणि फडणवीसही आपल्या देवाच्या चरणी पोचले. आज पंढरपूरात देवेन्द्र पण हसतोय आणि विठोबा पण प्रसन्न होऊन आशीर्वाद देतो आहे. षडयंत्र रचणार्‍यांची तोंडे काळी ठिक्कर झाली आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“जज साब आप भी ???” असेच म्हणायची सर्वसामान्य नागरिकांना वेळ आली आहे. सरकारी अधिकारी , पत्रकार मंडळी आणि राजकीय नेते यांना सरकारकडून मिळणारे बंगले सोडायची वेळ आली की अत्यंत वेदना होतात. काहीही ऊचापती करून बंगला काम ठेवण्याकडेच यांचा कल असतो ल्युटेन्स भागातील विशाल बंगले आणि ते काबिज करण्याच्या बदल्यात सरकारच्या सगळ्या कुकृत्यांवर पांघरूण घालणारी पत्रकारिता आपण महाआघाडीच्या 2004 ते 2014 च्या काळात बघितलीच होती. रामदास आठवले यांना सुद्धा खासदारकीची निवडणूक हरल्यानंतर बंगला सोडायचा नव्हता पण दलित नेता म्हणून त्यांची गरज संपली असल्याने कोंग्रेस सरकारने त्यांचे सामान रस्त्यावर आणून फेकले होते. या मालिकेत आता भारताचे निवृत्त सरन्यायाधीश पण जोडले गेले आहेत. माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना सरकारने बंगला सोडण्यासाठी ६ महिन्याचे एक्सटेंशन दिले.पण त्यानंतरही जेव्हा हा माणूस बंगला सोडण्यास तयार नाहीये असे दिसल्यास शेवटी सर्वोच्च न्यायालयानेच यासंबंधी केंद्र सरकारला पत्र लिहिले. प्रत्येक गोष्टीत संविधान, कायद्याचे राज्य, नियम आणि तत्त्व यावर बोट ठेवणारे हे निवृत्त न्यायाधीश सुद्धा बंगल्याच्या प्रेमात सगळे नियम कायदे धाब्यावर बसवतात. हे विदारक चित्र या निमित्ताने बघायला मिळाले आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राहुल गांधी,मल्लिकार्जुन खरगे,जयराम रमेश वगैरे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा पुन्हा हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला की पाकिस्तान ने भारताची किती विमाने,त्यात ही खास करून राफेल विमाने, पाडली ते सांगा.त्या युद्धाची युद्धबंदी जाहीर होऊन आता दोन महिने होतील पण भारत सरकारने काही काँग्रेसींच्या या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही आणि राहुल गांधी सह सर्व काँग्रेसींना हात चोळत,चडफडत बसावे लागले आहे.अखेर आता गेल्या काही दिवसात काँग्रेसच्या या प्रश्नाला ' अनपेक्षित कोपऱ्याकडून ' म्हणजे दसॉल्ट या राफेल चे उत्पादन करणाऱ्या फ्रेंच कंपनीच्या सी इ ओ कडून उत्तर आले आहे , ते म्हणाले की भारत पाकिस्तान युद्धाच्या काळात भारताचे एक राफेल विमान पडले ते पाकिस्तान ने पाडले नसून ३५,०००फुटांवरून उडताना त्या विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते पडले. पाकिस्तान ने भारताची राफेल विमाने पाडली ही अफवा आहे.आता तर दसॉल्ट कंपनीला अशी शंका येत आहे की यामागे चीन आहे. त्यांनीच आपले विमान विकले जावू म्हणून म्हणून पाकिस्तानच्या मदतीने हा दुष्प्रचार सुरू आहे. परंतु कोंग्रेस सुद्धा या खेळात चीनचे प्यादे म्हणून वावरते आहे का ? अशी साधार शंका आता निर्माण होते आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

सहकार मंत्रालय स्थापन्न करताना देवेंद्र फडणवीस जी यांची ही मदत घेतल्याचे बोलले जात आहे,रणजीतसिंह निम्बाळकर,हर्षवर्धन पाटील,जयकुमार गोरे,मदन भोसले,या सह अन्य नेत्यांना हाताशी धरून सहकारी संस्था पवारांच्या दावणीतून सोडवण्यासाठीच या मंतरलायची स्थापना झाली आहे. मोठं झाड़ तोड़ायच असेल तर झाडाच्या फांदया छाटाव्या लागतात त्याच प्रमाणे सहकारातुन सत्तेत येण्याचा मार्ग कायमचा बंद करून सहकार क्षेत्र जनतेसाठी राबवायचे असेल तर सहकारातील भ्रष्टाचाराच्या फांद्या छाटाव्याच लागतील,त्याचीच सुरुवात म्हणून सहकारी बँका आरबीआईच्या निर्देशात आणून या पुढे नागरी…


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page