अनिल गलगली यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांचे उपस्थिती
देशातील नामवंत माहिती अधिकार कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार अनिल गलगली यांचा वाढदिवस हजारो समर्थकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मुंबई भाजपचे क्रियाशील अध्यक्ष व आमदार अमित साटम तसेच प्रख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून अनिल गलगली यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार अमित साटम यांनी अनिल गलगली यांच्या सामाजिक आणि पत्रकारितेतील कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “मुंबईतील प्रत्येक विकासकामावर बारकाईने लक्ष ठेवून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि मुंबईकरांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी अनिल गलगली सातत्याने कार्यरत आहेत.”
प्रख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी अनिल गलगली हे आपल्या कौटुंबिक सदस्याप्रमाणेच असल्याचे सांगत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी उपस्थित असलेल्या हजारो समर्थक, मित्र, सहकारी आणि शुभचिंतकांच्या प्रेमाने व सदिच्छांनी वाढदिवसाचा सोहळा अधिकच संस्मरणीय ठरला.
अनिल गलगली यांच्या सामाजिक बांधिलकीच्या आणि जनहिताच्या कार्याला अशीच ऊर्जा, प्रेम आणि जनसमर्थन लाभत राहो, हीच सदिच्छा!







Comments