अतिवृष्टीग्रस्तांसाठी दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
- dhadakkamgarunion0
- Oct 29
- 1 min read
[ पंचनामा ]
==================
अतिवृष्टीग्रस्तांसाठी दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
● महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या ३१,६२८ कोटी रुपयांच्या विशाल मदत पॅकेजमधील आणखी ११ हजार कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाणार आहेत. आत्तापर्यंत सुमारे ८ हजार कोटी रुपयांचे वाटप ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये झाले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अतिरिक्त निधीला मान्यता देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तांत्रिक अडचणी आहेत किंवा नोंदींमध्ये त्रुटी आहेत, त्यांची माहिती तपासली जात आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना अंशतः मदत मिळाली आहे, जसे की, काही जणांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत पैसे मिळाले, पण प्रति हेक्टरी १० हजार रुपये मिळाले नाहीत; किंवा तीन हेक्टरऐवजी दोन हेक्टरचीच मदत मिळाली. यासंदर्भात कोणताही संभ्रम बाळगू नये, कारण याद्या जसजशा येत आहेत, तसतशी मदतीला मंजुरी दिली जात आहे. ज्यांना दोन हेक्टरची मदत मिळाली आहे, त्यांना तिसऱ्या हेक्टरचे पैसेही लवकरच जमा केले जाणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
-अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)







Comments