कोरोना काळात महाराष्ट्रातील सर्व परिस्थिती अत्यंत जबाबदारीने आणि कुशलतेने हाताळणारे राज्याचे आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांची आज विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, दैनिक मुंबई मित्र-वृत्त मित्रचे समूह संस्थापक श्री. अभिजीत राणे यांनी भेट घेतली. या भेटीत अभिजीत राणे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळात रात्र-दिवस अहोरात्रपणे करीत असलेल्या कामाचे कौतुक केले. आरोग्य मंत्र्यांच्या कार्याला तोड नाही अशा शब्दात कौतुक करीत शाल आणि श्रीफळ देऊन अभिजीत राणे यांनी त्यांचा सत्कार केला.
या भेटीदरम्यान आरोग्य मंत्र्यांबरोबर राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत अभिजीत राणे यांनी महत्वपूर्ण चर्चा केली. तसेच गोरेगाव पश्चिम येथील बांगूर नगर या ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी केली. या लसीकरण केंद्राचा लाभ धडक कामगार युनियनच्या कामगार वर्गाला, रिक्षा, टॅक्सी चालक मालक यांच्याबरोबरीनेच स्थानिक नागरिकांना, कामगारांना लसीकरणाचा लाभ घेता येईल असे आपल्या मागणीत स्पष्ट केले.
अभिजीत राणे यांनी केलेल्या या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करेल असे आश्वासन देत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दैनिक मुंबई मित्र-वृत्त मित्रच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडींवर प्रकाशझोत टाकणाऱ्या अभिजीत राणे यांचे कौतुक केले. त्याचबरोबर धडक कामगार युनियनच्या माध्यमातून कोरोना काळापासून करीत असलेल्या समाजोपयोगी कार्याबद्दल विशेष कौतुक करीत त्यांचे समाजकार्य असेच सुरु राहावे यासाठी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments