top of page
  • dhadakkamgarunion0

desk of abhijeet rane

*ABHIJEET RANE (AR)*

नगराध्यक्ष निवड सुधारणा विधेयकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विरोधकांची रेवडी उडवली. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,छगन भुजबळ, जयंत पाटील,धनंजय मुंडेना कोपरखळ्या मारल्या तेव्हा सदस्यांना हसू आवरेंना. शेवटी त्यांनीच भान राखून भाषण आवरते घेतले.


*ABHIJEET RANE (AR)*

नगराध्यक्ष निवडीच्या विधानसभा गृहातील चर्चेत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडेंनी सहभादी होताना आक्रमक धारदार वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष केले.ते म्हणाले मविआत नगविकासमंत्री राहिलेल्या शिंदेंना स्वत:चाच निर्णय मुख्यमंत्री बनून बदलावा लागला.

*ABHIJEET RANE (AR)*

विनायक मेटेंच्या अपघातांत त्यांच्या वाहनचालकाचीच चूक असल्याचे सामोरे येते.सभागृहांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहनचालकाच्या जबानी बदलासंदर्भात माहिती दिली. तेव्हाच वाहनचालक मेटेंच्या अपघातांत दोषी आढळत असल्याचे निदर्शनास येते.

*ABHIJEET RANE (AR)*

विरोधी पक्षनेते अजित पवार त्यांच्यापदाची कारकिर्द प्रचंड गाजवण्याची चिन्हे दिसताहेत. निधी वाटपांवरील त्यांच्या भाषणांत सत्तारूढ सदस्यांनी गोंधळ घातला तेव्हा स्पष्टवक्त्या अजितदादा़ंनी आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का? असा खडा सवाल केला.


*ABHIJEET RANE (AR)*

मनपाच्या आर साऊथच्या जल अभियंत्यांना भानच नाही. गेले सहा महिने त्यांच्या वॉर्डात ठाकूर संकुल व आशा नगरातील हजारोंची वस्ती पाण्यासाठी टाहो फोडते. पण जलविभाग वरिष्ठांवर ढकलतो. तर वरिष्ठ आमच्याकडून पाण्याचे योग्य वाटप होते सांगतात.

*ABHIJEET RANE (AR)*

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचे शिवसैन्कांना भावनिक आवाहन करण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत म्हणूनच त्यांनी महाराष्ट्राचा दौरा जाहीर केलायं. शिवसैनिकांना धगधगत ठेवण्यासाठी बंडखोर आमदार आपल्याशी नीट नाही वागले असा दावा त्यांनी केला.

4 views0 comments

Comments


bottom of page