top of page
Search

deskofabhijeetrane

  • dhadakkamgarunion0
  • Jul 12, 2022
  • 1 min read

*ABHIJEET RANE (AR)*

बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळताच भाजपाने खूषीत सुप्रीम कोर्ट बनत थेट शिवसेनेच्या घटनेपर्यंत पोचले तर मविआला हुरूप चढून ते शिवसेनेच्या बाजूने निकालाची स्वप्न पाहू लागले. आधीच दोघांची स्थिती कशात काय आणि फाटक्यात पाय तरीही दोघं शेठ....


 

*ABHIJEET RANE (AR)*

बंडखोरांविषयी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर येताच सुरूवातीला शिवसेनेचा सूर थोडा लागलाच नाही. त्यांच्या आशा अपेक्षाच बंद झाल्या तर भाजपात त्याउलटॉ परिस्थिती होती. ही लढाई दिर्घकालीन व्हावी असे त्यांना वाटत होते. न्यायालयाची ऑर्डरही त्यांच्याच पारड्यात.

 

*ABHIJEET RANE (AR)*

शिंदें गटाची बंडखोरी उध्दव ठाकरेंना मुंबई-ठाणे ह्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच जड जात आहे. नारायण राणे, छगन भुजबळ आदिंच्यावेळी मातोश्रीकडे ढुंकून पाहायची कोणाची हिम्मंत नव्हती.आता गल्लीबोळातील शिवसैनिक पक्षप्रमुखांना सल्ले देऊ लागलाय.

 

*ABHIJEET RANE (AR)*

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उध्दव ठाकरें दोलायमान स्थिती. शिवसेनेच्या खासदारांत द्रोपदी मुर्मूचा एक गट तर दुसरा यशवंत सिन्हांचा.त्यामुळे ठाकरेंची स्थिती इकडे आड तिकडे विहीर. त्यातून सुटण्यासाठी भाजपच्या नेत्यांची ते वाट बघत असावेत.


 

*ABHIJEET RANE (AR)*

पायाच्या ऑपरेशननंतर तीन महिन्यांची विश्रांती सांगितली असूनही शिवसेनेतील बंडखोरीने राज ठाकरे चलबिचल झालेत. शिवसैनिक फुटून भाजपात जाण्यापेक्षा मनसेच्या दारांत आले तर अप्रत्यक्षपणे बाळासाहेंबांच्या घरचे दान शिवसैनिकांना मिळेल असे त्यांना वाटते म्हणे.

 

*ABHIJEET RANE (AR)*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्तारांत मनसेला स्थानच मिळू नये यासाठी आरपीआय सक्रीय झाली आहे.निवडणुकीच्यावेळी मनसे सोबत नव्हती मग त्यांना मंत्रिपद नकोच अशी रामदास आठवलेंची मागणी. त्यामुळे राज यांची याबाबतची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच कळेल.

 
 
 

Recent Posts

See All
🖋️ अभिजीत राणे लिहितात

🖋️ अभिजीत राणे लिहितात भारतातील सर्वात लोकप्रिय माणूस -भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे, हा भारतीय जनतेच्या गळ्यातला ताईत बनला आहे. कारण...

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page