*ABHIJEET RANE (AR)*
राष्ट्रपतीपदाच्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवारांची शिफारस काँग्रेस पक्ष करणार आहे. खरचं ही फक्त महाराष्ट्रापुरती नव्हे तर देशासाठी आनंदाची बाब आहे. देशाच्या सर्वोच्चपदी पवार बसले तर पाच दशकांपासूनची त्यांची राजकारणातील तपश्चर्या खऱ्या अर्थाने फळाला येईल.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
राज्यसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या पराभवाने हादरलेल्या मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादीने विधानपरिषद निवडणुकीत अधिक काळजी घ्यायला सुरूवात केली आहे. काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खर्गे व राष्ट्रवादीचे शरद पवारांनी आपापल्या पक्षाच्या मंत्र्यांचे कान ओढले.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
भाजपने आता मनपाच्या प्रभागातील मान्यवरांना व धनिकांना आपल्याकडे खेचण्यास सुरूवात केली आहे. उपनगरातील उद्योगपतींना स्थानिक नेत्यांच्या कार्यालयात बोलावून सन्मानित करताना त्याला पक्षात आमदाराच्या उपस्थितीत प्रवेश करायला लावला जातो.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
संजय राऊत काठावर पास झाल्यामुळे गेल्या मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेना भाजपपुढ्यात तोंडावर आपटताना वाचली. तशीच अवस्था राज्यसभेच्यावेळी होती. विधानपरिषदेतही दोन जागांसाठी प्रत्येकी २७चा कोटा म्हणजेच सेना पुन्हा काठावरच.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
डेक्कन हेराल्डप्रकरणी काँग्रेसचे युवराज राहूल गांधीची ईडीने चौकशी केली.त्यामुळे देशभरातील काँग्रेस जनांमध्ये आगडोंब उसळला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आंदोलने केली पण तरीही त्यांच्या डोक्यात शिरेना डेक्कन हेराल्डची चौकशी न्यायालयाने करायला लावली आहे.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
आदित्य ठाकरे अयोध्येला निघालेत त्यापूर्वी मुंबई, ठाणे, नाशिकातून किमान तीनचार हजार शिवसैनिका़ंचा जथ्था तिथे पोहचेल.त्यासाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत.पण ईतका खटाटोप करून मुंबई मनपा निवडणुकीत उत्तर भारतीयांची मते मिळणार का?
Comments