@ABHIJEETRANE (AR)
माजी आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या पत्रकार परिषदेत महाआघाडी सरकारच्या कारभाराचा पुराव्यानिशी सिद्ध पंचनामा असतो तर बाकी भाजपा नेते उदाहरणार्थ: रावसाहेब दानवे , चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, गिरीश बापट इत्यादी हवेत वार करून महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना भाजपाला हास्यास्पद आणि टीकास्पद करून विश्वासार्हता कमी करण्याची आयती संधी उपलब्ध करून देतात. पण पंचाईत अशी की एकट्या फडणवीसांनीच बोलावे इतर भाजपा नेत्यांनी बोलू नये असे पक्षांतर्गत लोकशाहीची सूत्रे जपायची असल्याने कसे म्हणणार? कोण म्हणणार? एक वेगळा मुद्दा असाही अधोरेखित होतो की केंद्रात ज्या प्रकारे मोदी यांना पर्याय नाही तसेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना अख्ख्या भाजपा मध्ये पर्याय नाही!
www.abhijeetrane.in

@ABHIJEETRANE (AR)
देवेंद्रजी फडणवीस यांनी "लोकांच्या मनात महाआघाडी सरकारच्या विरोधात असंतोष आहे" हा मांडलेला मुद्दा अचुक आहे आणि भाजपा त्या असंतोषाला आंदोलनांमागून आंदोलने करीत प्रभावीपणे वाचा फोडत आहे हे देखील सत्य आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जेवढे यशस्वी ठरले तेवढेच विरोधी पक्ष नेते म्हणून ते यशस्वी ठरले आहेत यात शंका नाही. विचार करा की जर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेते नसते आणि केंद्र सरकार मध्ये मंत्री असते तर महाआघाडी सरकारला आव्हान देणारा नेता भाजपाकडे नव्हता आणि महाआघाडी सरकारला कितीही अन्याय अत्याचार दडपशाही भ्रष्टाचार गैरव्यवहार केले तरी जाब विचारला गेला नसता. आज महाआघाडी सरकार अस्थिर आणि डगमगत्या अवस्थेत आहे ते केवळ केवळ फक्त फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे. महाराष्ट्रात महाआघाडी सरकारच्या डझनभर नेत्यांना आणि तीन पक्षांच्या एकत्र असण्याला पर्याय माझ्या मते भाजपा हा पक्ष नाही तर देवेंद्र फडणवीस ही एकमेवाद्वितीय व्यक्ती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदासाठी मोदी आणि शहा यांनी महाराष्ट्रात सत्ता गेली तरी चालेल इतकी कठोर भूमिका घेतली कारण देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपाची सत्ता पुन्हा आणतील याची त्यांना खात्री होती. बिहार मध्ये नीतीश कुमार यांना कमी जागा असून मुख्यमंत्री केले आणि महाराष्ट्रात फक्त एकट्या उद्धवजींना मुख्यमंत्री करा बाकी सारे मंत्री भाजपाचे केलेत तरी चालेल इतकी लवचिक भूमिका घेऊन देखील मोदी आणि शहा यांनी उद्धवजींना मुख्यमंत्री न करता विरोधी पक्षात बसणे स्वीकारले याचा अर्थ समजून घ्यायला हवा. जर बिहार मध्ये नीतीश कुमार यांना मुख्यमंत्री केले पण महाराष्ट्रात उद्धवजींना केले नाही हे असे का आणि कसे झाले हे ज्या दिवशी शिवसेना नेत्यांना कळेल तेव्हा ते कुठे कसे चुकले हे त्यांना कळेल. राष्ट्रवादी पक्षाला पुढील विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवसेना आणि उद्धवजींना बदनाम करून आणि गांधी काँग्रेसवाल्यांची राजकीय नसबंदी करून सत्ता मुख्यमंत्री सुप्रिया सुळे यांना करीत काबीज करायची आहे हे जगजाहीर आहे. आता उद्धवजी ठाकरे विरूद्ध देवेंद्र फडणवीस असा मुकाबला राहिलेला नाही तर शरद पवार साहेब विरूद्ध देवेंद्रजी फडणवीस असा संघर्ष सुरू झाला आहे! शिवसेनेचे नव्हे तर पवारांचे प्रवक्ते खा.संजय राऊत हे आहेत तर भाजपाचे नेते वक्ते प्रवक्ते सूत्रधार फक्त केवळ एकमात्र दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस आहेत. पवारांकडे हुकुमाचा एक्का मराठा कार्ड आहे तर देवेंद्र फडणवीस यांचा हुकुमाचा एक्का बहुजन समाजातील सर्व जाती जमातींची महाआघाडी सरकारच्या विरोधात असंतोष आणि एकजूट हे आहे.

@ABHIJEETRANE (AR)
आ. प्रताप सरनाईक यांनी उद्धवजींच्या "ढाली"ची राजकीय भूमिका घेतली तेव्हाच योद्धा वार चुकवण्यासाठी "ढाल" पुढे करतो आणि आघात "ढाली"वर होतो तर आणि तेव्हाच योद्धा बचावतो हे सरनाईक यांनी गृहीत धरले असायला हवे.. ईडी ची धाड जेव्हा "ढाली"वर पडली तेव्हा हे "संकट" नव्हे तर "निष्ठा" सिद्ध करण्याची संधी समजून कालांतराने मंत्रीपदासारखे "फळ" मिळेल या आशेवर आज हे आघात भूषणावह घाव म्हणून सोसले आणि जखमांचे व्रण मिरवले पाहिजेत!!
www.abhijeetrane.in

@ABHIJEETRANE (AR)
मुख्यमंत्री उद्धवजींची चौकशी आणि कारवाई होणार नाही हे 100% नक्की नक्की नक्की पण त्याच्या बाजूने भूमिका घेऊन मोदी आणि शहा यांच्या विरोधात बोलणा-या शिवसेनेच्या अनेक नेत्यांना इनकम टॅक्स , ईडी , सीबीआय चौकशी आणि कारवाईचे फटके बसणार. तसेच मोदी आणि शहा किंवा फडणवीस यांच्या नादी महाआघाडी सरकारच्या यंत्रणा अजिबात लागणार नाहीत पण त्यांचे समर्थन केले त्या अर्नब गोस्वामीच्या किंवा कंगनाच्या मागे जशी चौकशी आणि कारवाईची शुक्लकाष्टे लावली तशी ती यापुढील काळात प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्या मागे महाराष्ट्र सरकार लागल्याशिवाय रहाणार नाही. बुद्धीबळात राजा चेकमेट होतो पण मरत नाही तसेच राजकारणात राजांना अभय असते पण वजीरापासून प्याद्यापर्यंत कुणी सुरक्षित नसते. राजासाठी राजनिष्ठांनी त्याग करण्याची आणि बळी जाण्याची भारतीय परंपरा आहे.. ! प्रताप सरनाईक त्या परंपरेचे पालन करीत आहेत फक्त मला काळजी वाटते आहे ती विहंग आणि पूर्वेश या मुलांच्या व्यावसायिक आणि राजकीय भवितव्याची. 56 वर्षे वयाच्या प्रताप सरनाईक यांनी आरंभिलेल्या लढाईत तिशीच्या या दोन उमद्या तरुणांना काय काय भोगावे लागेल आणि त्यागावे लागेल हे सांगता येत नाही.. विशेष म्हणजे ज्या उद्धवजींच्या वतीने / करीता प्रताप सरनाईक यांनी स्वतःची पत प्रतिष्ठा प्रतिमा संपत्ती पणाला लावली त्या उद्धवजींच्या राजपुत्र आदित्य ठाकरे यांना या सूडाग्नीची जराही झळ / धग लागलेली नाही / लागणार नाही. इतिहासात सरदार मरतात म्हणून राजे जगतात याची हजारो उदाहरणे आहेत पण सरदाराला वाचवण्यासाठी राजाने बलिदान केल्याची कथा नाही. इतिहासाची पुनरावृत्ती आजही होते आहे एवढेच मी म्हणेन!
www.abhijeetrane.in

Comments