top of page
  • dhadakkamgarunion0

desk of Shri. Abhijeet Rane

*@ABHIJEETRANE(AR)*

सर्वोच्च न्यायालय शेतकरी आंदोलनात हस्तक्षेप करणार आणि महामार्गावरील कोंडी बळाचा वापर करून फोडण्यासाठी केंद्र सरकारला आदेश देणार हा मेसेज मी दोन दिवसांपूर्वी केला होता तो आज खरा ठरताना दिसतो आहे. शेतकरी आणि सरकारच्या संयुक्त समितीमधून काही परस्परसंमत तडजोड होणार नाही नाही नाही हे सर्वोच्च न्यायालयाला ठाऊक आहे.. पण पण पण यातून प्रश्न सुटणार नाही तरी शेतक-यांना महामार्गांवरून हटविण्यासाठी केंद्र सरकारला आदेश / संधी मिळेल शिवाय आंदोलन विस्कळीत होईल, हळूहळू बारगळू लागेल आणि त्या साठी आवश्यक कालहरण समितीच्या निमित्ताने होईल. शेतकरी संघटनांनी समितीत सहभाग नाकारला किंवा महामार्गावरील कोंडी उठवली नाही तर तो न्यायालयाचा अवमान होईल आणि कारवाई होईल. केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष वाढतो आहे हे खरे पण न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे तो सरकार ऐवजी न्यायालयाकडे काही प्रमाणात वळेल आणि केंद्र सरकार न्यायालयाकडे बोट दाखवत नामानिराळे राहू शकेल. मला हा घटनाक्रम अपेक्षित होता.

www.abhijeetrane.in


 

🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*

एबीपी माझा आता नव्या लोगोसह नवीन आकर्षक रंगढंगात प्रकटला आहे. मला संपादक राजीव खांडेकर यांचे कौतुक आणि अभिनंदन एवढ्याकरीता करायचे आहे की बहुतेक न्यूज चॅनल्सचे संपादक फक्त स्वतःची इमेज आणि ब्रँडींग करीत असताना खांडेकरांनी मनाचा मोठेपणा आणि 'टीम'ला मोठे केले तर चॅनल मोठा होतो ही जाणीव ठेवून सर्व वृत्त निवेदक आणि सूत्रसंचालक यांच्याही इमेज आणि ब्रँडींगसाठी खास जाहिराती तयार करून वारंवार प्रसारित करीत आहेत. तुमच्या टीम मधील सहकारी आणि सहभागी सदस्यांना मोठे केले / दाखवले तर तर तरच तुमचा चॅनल किंवा मिडीया आणि संपादक / संचालक म्हणून व्यक्तीशः तुम्ही देखील मोठे होता हे व्यावहारिक, व्यावसायिक सत्य क्वचितच कुणा मिडीया मुखियांना उमजते आणि उमजले / समजले तरी अहंकार आणि असुरक्षिततेची भावना त्यांना परावृत्त करते. उदय निरगुडकर, विजय कुवळेकर, निखिल वागळे, आशिष जाधव अशांमुळे न्यूज चॅनल्सना इमेज आणि टीआरपी मिळाले पण हे संपादक न्यूज चॅनल्सपेक्षा अधिक मोठे होत आहेत या मालकांच्या मनातील संशय असूया मत्सर द्वेष यामुळे अपमानित करून त्यांना न्यूज चॅनल्सवरून काढून टाकण्यात आले / राजीनामे देणे भाग पाडले. विचार करायला हवा असा हा विषय आहे !!!

www.abhijeetrane.in


 

🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*

माझ्या विशेष माहितीनुसार न्यायालयाने आदेश दिला या बहाण्याने नाईलाजाने का होईना पण महाराष्ट्र सरकार मेट्रो कार शेड कांजूरमार्गला शिफ्ट करण्याचा निर्णय मागे घेऊन पुन्हा आरे काँम्प्लेक्स मध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेईल घेईल घेईल.. आज अशक्य अशक्य अशक्य वाटत असले तरी यापूर्वी देखील मी अशक्य वाटणा-या अनेक गोष्टी कालांतराने शक्य आणि आवश्यक ठरतील अशा केलेल्या भविष्यवाणी ख-या ठरल्या आहेत हे लक्षात घेऊन मी सांगतो ते गांभीर्याने घ्या. मेट्रो कार शेड कांजूरमार्गला शिफ्ट करण्याचा निर्णय बदलल्याशिवाय मेट्रो रेल्वे सुरू होणार नाही हे आजही ठाकरे सरकारला कळून चुकले आहे जरी ते लगेच कबूल करणे शक्य नाही कारण ते पराभव मान्य करून शरणागती पत्करल्यासारखे होईल.

www.abhijeetrane.in


 

🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*

माझे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात किंवा समर्थनात काही मत नाही पण पण पण.. माझ्या संवाद संपर्क सहवासात येणा-या भाजपा नेत्या-कार्यकर्त्यांच्या भावना विचार भूमिका लक्षात घेऊन आता मलाही असे वाटू लागले आहे की: चंद्रकांत दादा पाटील पक्षाध्यक्ष म्हणून अपयशी अपात्र अकार्यक्षम ठरले नव्हे तर सिद्ध झाले आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमित शहा यांच्या सारखा "असेट" सहकारी लाभला असताना महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी चंद्रकांतदादा "लायबलिटी" ठरत आहेत. चंद्रकांतदादा भाजपाच्या गळयातले लोढणे आणि फडणवीसांच्या पायातील ओढणे ठरत आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्याजागी नवा प्रदेशाध्यक्ष नेमायला हवा या भूमिकेतील भाजपा नेत्या/कार्यकर्ते यांना चंद्रकांतदादा अमित शहा यांच्या निकटवर्तीयांमध्ये असल्याने त्यांना संरक्षण मिळते हा मुद्दा निराश हताश करणारा ठरतो. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी चंद्रकांतदादा म्हणजे एक प्रकारे गैरसोयीतली सोय देखील आहे कारण ते "स्वैरोच्चारी" असले तरी स्पर्धक नाहीत आणि असेच वागत बोलत स्वतःच्या पायावर कु-हाड मारून घेत राहिले तर नुकसान बरेचसे चंद्रकांतदादांचे , काहीसे भाजपाचे होईल पण देवेंद्रजींना महाराष्ट्रात आणि नरेंद्र मोदी यांना राष्ट्रात पर्याय नाही हे अधिकाधिक अधोरेखित होत राहील.

www.abhijeetrane.in


 

🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात करणी करून बळी घेण्यासाठी अघोरी पूजा करणा-या दोघांना अटक करण्यात आली आहे. ह्या आरोपींना जादूटोणा करण्यासाठी पाच लाख रुपये दिले होते अशी कबुली त्या देवदेवस्की करणा-यांनी दिली आहे. अनाकलनीय अनपेक्षित आणि आश्चर्यकारक मुद्दा हा आहे की एकनाथ शिंदे यांच्यावर करणी करून अपाय करण्यासाठी पाच लाख रुपये देणा-या व्यक्तीचे नाव आणि इतर तपशील आरोपींनी दिलेला असूनही ही व्यक्ती एक राजकीय नेता असल्याने पोलिसांनी ते नाव एकनाथ शिंदे यांच्या संमतीने गुप्त ठेवले आहे अशी चर्चा होते आहे. याचे एक कारण हे असू शकते की त्या "सुपारी" देणा-या नेत्याचे नाव जाहीर केले तर शिवसेना संघटना बदनाम होईल. दुसरे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात करणी करण्याच्या अधःपतनापर्यंत जाण्याइतके टोकाचे शत्रू शिंदे यांना शिवसेनेत आहेत हा मेसेज समाजात जाणे गैरसोयीचे आणि बदनामीकारक ठरणारे आहे. तिसरे म्हणजे जादूटोणा करण्यासाठी पाच लाख रुपये सुपारी देणा-या नेत्याने त्या अघोर पंथीयांना अटक होताच एकनाथ शिंदे यांच्यापुढे चूक कबूल करीत शरणागती पत्करून अभयदान मिळवले असल्याने पोलिसांनी तक्रारी मधील "त्या"चे नाव एकनाथ शिंदे यांच्या संमतीने वगळले आहे अशी जोरदार चर्चा आहे. एकनाथ शिंदे उद्धवजींच्या जवळचे नेते आहेत आणि उद्धवजींच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांचे नाव महाआघाडीच्या मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर होते हे तेव्हा आणि आताही सत्य आहे. कार्यकर्त्या शिवसैनिकांना प्रिय आदरणीय विश्वसनीय माननीय वाटणारे एकनाथ शिंदे यांच्यावर "जळणा-या" लोकांची संख्या कमी नाही आणि हा पराकोटीचा द्वेष वैफल्य संताप चीड राग मत्सर करणी करून जीव धोक्यात नेण्यापर्यंत गेला ह्यात फार आश्चर्य वाटून घेऊ नका. सर्व राजकीय पक्षात जादूटोणा करणी यावर विश्वास ठेवणारे अनेक अनेक नेते आहेत. शिवसेनेच्या एका माजी मंत्र्यांना कानात घुमत भंडावणा-या कर्ण पिशाच्च बाधेने कशी वेड लागेल अशी अवस्था झाली आहे हे कोणत्याही शिवसेना नेत्यांना विचारलेत तर नाव कळेल इतकी ही अघोरी कथा सर्वतोमुखी आहे!!

www.abhijeetrane.in
4 views0 comments

Comments


bottom of page