@ABHIJEETRANE(AR)
दुर्दैवाने माझे वारंवार केलेले भाकित खरे ठरले. मी किमान पंचवीस वेळा मेसेजमध्ये लिहिले होते की: सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला दिलेली हंगामी स्थगिती उठणार नाही नाही नाही ! शिवाय महाआघाडी सरकार आणि त्यात सहभागी पक्षांना इशारा दिला होता की: मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका.. तो विस्तवाशी खेळ ठरेल.. भस्मसात करणारा भडका उडेल ." मराठा आरक्षणाचा खटला घटनापिठापुढे जाताना त्याला सरकारच्या भाषेत अनपेक्षित आणि अनाकलनीय अशी स्थगिती न मागता मिळाली तेव्हाच सर्वोच्च न्यायालयाच्या भविष्यातील निर्णयाची कल्पना महाआघाडी सरकारला आली होती. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्रजींच्या काळात मराठा आरक्षणाच्या तरतुदीला स्थगिती मिळाली नव्हती हे त्यांचे अभूतपूर्व असे यश होते. देवेंद्रजींनी केलेली परिणामकारक सामाजिक वातावरण निर्मिती, न्यायालयीन युक्तीवादासाठी देवेंद्रजींनी वकीलांना केलेले अचुक आणि चातुर्यपूर्ण मार्गदर्शन आणि न्यायालयातील याचिकेचे प्रशासकीय व्यवस्थापन यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली नव्हती.. नव्हती .. नव्हती! देवेंद्र फडणवीस यांना मिळालेले यश महाआघाडी सरकारला मिळणार नाही हे स्पष्ट दिसत होते. प्रमुख महाआघाडी सरकारच्या घटकपक्षांमध्ये न्यायालयातील युक्तीवादाबाबत एकवाक्यता दिसत नव्हती. काही महाआघाडी नेत्यांची आॅन दि रेकाॅर्ड आणि ऑफ दि रेकाॅर्ड भूमिका विसंगत व संशयास्पद असल्याची चर्चा निराधार नसावी अशी शक्यता दिसते. मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन आंदोलन करणा-या संघटना आणि पदाधिकारी यांची फसवणूक मराठा समाजासोबत झाली ह्याची जबाबदारी सरकारची की कोणाची ? अशी विचारणा केली जाणार आहे. स्थगिती उठली नाही ह्या दुःखाच्या जखमेवर मीठ चोळणे ठरेल असा आणखी एक निर्णय न्यायालयाने दिला तो म्हणजे आता स्थगिती उठविण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत चर्चा होणार नाही तर थेट नियमित सुनावणी 25 जानेवारी पासून सुरू होईल आणि मधल्या काळात स्थगिती कायम राहील. महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे यात शंकाच नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजींनी विरोधी पक्ष नेते देवेंद्रजींशी सल्ला मसलत केली नाही त्यामुळे हे संकट महाआघाडी सरकारने आपल्या हाताने ओढवून घेतले असे मला वाटते. 25 जानेवारीला सुनावणी सुरू झाली तरी खटल्याचा अंतीम निकाल लागेपर्यंत स्थगिती उठणार नाही नाही नाही हे गृहीत धरून मराठा आंदोलकांना आंदोलनाची पुढली दिशा आणि स्वरूप ठरवावे लागेल हे नक्की नक्की नक्की!
Comentarios