*ABHIJEET RANE (AR)*
सत्ताधाऱ्यांना मर्यादा असल्यामुळे रंगत असलेल्या गणेशोत्सत्वात आणखीन दंग राहणे जमण्यासारखे नाही. त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडील सुनावणीस न्यायालयाने स्थगिती देवू नये करावी अशी मागणी रिट याचिकेत केली आहे.त्याचा निकाल शिदेंच्या गटाच्या बाजूने लागल्यास जल्लोषापाठोपाठ मंत्रिमंडळ विस्तार सोबतच कामांचा उरक मुख्यमंत्रीमहोदयांना अपेक्षित आहे.म्हणून ते अस्वस्थ असून राजकीय समन्व्यय व सलोखा राखण्यासाठी प्रमुख नेतेमंडळीचे उंबरठे झिजवत आहेत.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
सुप्रिम कोर्टाच्या एका निवाड्यानुसार पाहता राज्यातील मुंबई-ठाणे मनपा निवडणुकांसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर मध्यावधीपर्यंत आटोपणे आवश्यक होते.परंतु तसे न होता या निवडणुका नोव्हेंबरपर्यंत लांबत आहेत. स्वत: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें तशी शक्यता वर्तवित आहेत.त्यामुळे या निवडणुका विनाकारण लांबवल्या जाताहेत असा सर्वसामान्यांचा ग्रह होत असून त्याचे निराकरण तातडीने होणे महत्वाचे आहे. अन्यथा आपल्याकडील प्रसारमाध्यमे. राज्य सरकारविरोधात काहूर माजविण्यासाठी जंगजंग पछाडत आहेतच ह्याचा विसर न पडो.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदें राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे त्यांच्या घरगुती गणपतीच्या दर्शनासाठी गेले.त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वर्षा निवासस्थानी गणरायाच्या दर्शनाला सहकु़टु़ंब सहपरिवार पोचले परंतु राजकीय पटलांवर याचा संबंध राज्यपाल नियुक्त १२ आमदारा़ंच्या यादीशी जोडण्यात आला. जी मविआ सरकारने राज्यपालांकडे सुचविलेल्या यादीशी संबधित होती. आता यात शिंदे-राज्यपाल-राज भेटीचे राजकारण समाजमाध्यमांना कुठून दिसले? हेच अनेकांना समजत नाही.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना खासदार गजानन किर्तीकर ह्यांच्यातील भेटीगाठी वाढत असल्यामुळे शिवसैनिक आतून हादरलाय. त्यांना किर्तीकर गेले की सर्वसामान्यांच्यात मानसन्मान मिळवलेली स्थानिय लोकाधिकारी समिती शिवसेनेच्या हातून गेली असे वाटत आहे. पण किर्तीकर शिंदें गटांत गेले तरीही त्यांच्या लोकसभा मतदारसंघात मात्र सेनेच्या मतदारांना फारसे आश्चर्य वाटण्यासारखे नाही. त्यांच्या मते सद्या किर्तीकरांचा वावर किंवा त्यांच्या कामांची दखल घ्यावे असे कोणतेही कार्य त्यांच्याकडून झाले नाही.सक्रीय सहभागच नाही. त्यामुळे त्यांची एवढी चिंता करण्याची गरज नाही. परंतु किर्तीकरांची शिवसेनेतील नाराजीची कारणे मात्र लक्ष देण्यासारखी आहेत. एक म्हणजे गेल्या अडीच वर्षात मविआ सरकारच्या काळांत किर्तीकरांची पक्षप्रमुखांनी किंवा अन्य सेनानेत्यांनी कधी दखल घेतली नाही आणि दुसरे मोठे कारण म्हणजे किर्तीकरांना त्यांचे पुत्र अमोलची काळजी लागली आहे.अमोल राजकीय क्षेत्रांत जम बसवण्यासाठी संघर्ष करताहेत पण म्हणावा तेवढा प्रतिसाद त्यांना मिळत नाही.तेव्हा अमोलना पक्षाकडून योग्य ते सहकार्य होत नाही. त्यामुळे नमो व देवेंद्रंच्या लाटेवर तरण्यासाठी शि़दें गटाचा वापर शिडासारखा करावा असा विचार किर्तीकरांनी केला असेल तर तो अयोग्य कसा? असाही सवाल विचारला जातोय पण त्याचे उतर सेनेच्या नेतेमंडळीकडून मिळत नाही.
Comments