*ABHIJEET RANE (AR)*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला.विस्तारांत कॅबिनेट मंत्र्यांचा जातीनिहाय व महसूल विभागनिहाय समावेश योग्य समतोल साधत केल्याने शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वगुणांचे विशेष कौतुक त्या़ंच्या समर्थकांनी केले.

◆
*ABHIJEET RANE (AR)*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्तारांत संजय राठोडांचा समावेश कॅबिनेट मंत्री म्हणून झाल्याने विरोधकांनी काहूर माजवलं.राठोडांना मविआ सरकारने क्लीन चिट दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केल्यानंतरही राठोडांच्या समावेशावर विरोधकांकडून टिका सुरूच होती.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्यांचा समावेश झाला नाही म्हणून विरोधी महिला लोकप्रतिनिधींनी शिंदें सरकारवर प्रखर हल्ला चढविला.ते पाहून जणू काही शिंदें सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ पूर्ण बनले असा गैरसमज पसरला नाही हे नशिब.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकार कोसळेल अशी वल्गना करणाऱ्यांच्या तोंडात सणसणीत चपराक बसली आहे.आता शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल तरी संबधित वायफळ बडबड करणारे तोंड बंद ठेवतील ही अपेक्षा आहे.

◆
*ABHIJEET RANE (AR)*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती आहे अशी खिल्ली शिवसैनिक उडवतात. पण मविआ सरकारांत दस्तुरखुद्द उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असूनही सत्तेच्या चाव्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हाती होत्या हे सत्य ते कसे विसरतात?
◆
*ABHIJEET RANE (AR)*
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टिका करण्याच्या कामांत मशगूल आहेत.त्याऐवजी ईडी कोठडीतील संजय राऊतांना सोडवण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसारखे उध्दव सरकारचे नाव देशभर घेतले गेले असते.
Comments