top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • May 9
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जस्टीस यशवंत वर्मा यांच्या घरात 15 कोटी रुपये रोख रक्कम सापडली होती ज्याचे कोणतेही स्पष्टीकरण त्यांनी दिले नव्हते. कोलेजियम सिस्टिम मध्ये न्यायमूर्ती मंडळींना सर्वाधिकार असल्याने सरकार या संदर्भात काहीही कारवाई करू शकत नाही.सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात एक चौकशी समिती नेमली होती आणि त्या समितीच्या अहवालात न्यायमूर्ती यशवंत शर्मा हे दोषी असल्याचे आढळून आले आहे. आता त्यांनी सन्मानपूर्वक आपल्या पदाचा त्याग करणे अपेक्षित असताना त्यांनी राजीनामा देण्यास ठाम नकार दिला आहे. यामुळे केवळ त्यांची नाही तर सर्वोच्च न्यायालयाची आणि एकंदरच न्यायव्यवस्थेची बदनामी होते आहे. आता सरन्यायाधीश स्वतःच्या अधिकारात त्यांना बडतर्फ करू शकतात किंवा संसदेत त्यांच्यावर महाभियोग चालवला जाऊन त्यांना बडतर्फ केले जाऊ शकते. परंतु संसदेत महाभियोग चालवला गेला तर कोलेजियम सिस्टिम चे अक्षरशः वाभाडे निघातील आणि या व्यवस्थेला बदलण्याची संधी मोदी सरकारला प्राप्त होईल त्यामुळे पुढील घटनाक्रम अत्यंत रंजक असणार आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पहलगाम हल्ला 22 एप्रिलला झाला आणि महाराष्ट्रातील एक महत्वाची राजकीय घडामोड होता होता थबकली. शरद पवार आपली सुकन्या आणि आपला छोटासा राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष घेऊन अजित पवारांच्या ऑफिशियल सिद्ध झालेल्या राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षात विलीन होणार होता. 2017 पासून राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष भाजपाशी युती करण्याच्या मानसिकतेत होता. 2019ची घडामोड सुद्धा त्याचाच परिपाक होता परंतु प्रत्येक वेळी सुप्रिया सुळेंच्या प्रचंड विरोधामुळे शरद पवारांना माघार घ्यावी लागली. शरद पवार सत्तेपासून फार काळ दूर राहुच शकत नाहीत हाच त्यांचा राजकीय इतिहास आहे त्यामुळे त्यांची तडफड आपण समजून घेतली पाहिजे. शरद पवार आपल्या सुकन्येसह इकडे आले आणि महायुतीचा भाग झाले की आपोआपच सुप्रिया ताईंना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. आणि राज्याच्या मंत्रीमंडळाचा सुद्धा थोडाफार विस्तार होईल. या सगळ्या घडामोडीतील सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार शिरोमणींना मिठी मारल्याने भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा पक्ष ही भारतीय जनता पक्षाची प्रतिमा पुर्णपणे संपुष्टात येईल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पाकिस्तानशी सुरू असलेल्या संघर्षातून एक महत्वाची गोष्ट सिद्ध झाली आहे. एस ४०० तसंच भारतीय डिफेन्स सिस्टीम्स / अ‍ॅंटी ड्रोन सिस्टीम्स जवळपास १२ तासांपासून सक्रीय असून त्यांचा रिझल्ट् १००% आहे. पाकीस्तान चा प्रत्येक हल्ला उध्वस्त.... प्रत्येक ड्रोन नष्ट, प्रत्येक क्षेपणास्त्र हवेतच नष्ट. यात लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे एस ४०० मुख्यत्वे फायटर जेट्स आणि मोठ्या क्षेपणास्त्रांसाठीच फायर केले गेले. याचा सरळ अर्थ होतो कि रशियन एस ४०० एवढंच उत्कृष्ठ काम मेक इन ईंडीया वॉर मशीनरीही करत आहेत. इथे डी आर डी ओ चं अभिनंदन अत्यावश्यक आहे. आत्मनिर्भर भारत चं अभिनंदन अत्यावश्यक आहे, मेक इन इंडीया चं अभिनंदन अत्यावश्यक आहे. याच मेक इन इंडीया मोहीमेला राहुल गांधी बब्बरशेर म्हणत खिल्ली उडवत होते हे आवार्जून आठवा. एस ४०० खरेदीमध्ये, राफेल खरेदीमध्ये तत्कालीन कॉंग्रेसी सरकार स्वत:च अड्थळे आणत होतं. विद्यमान भारत सरकार, डी आर डी ओ, इस्रो, मेक इन इंडीया, आत्मनिर्भर भारत या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन ..

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

परिपक्व राजकारण काय असते याचे शशी थरूर यांनी उदाहरण दिले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे आणि त्यांनी या सगळ्या धावपळीत पक्षीय चौकटीच्या बाहेर जाऊन पूर्णपणे सरकारला समर्थन दिलं आहे. ते उघड उघड सरकारचं समर्थन करत आहेत, त्याची तीव्रता लक्षात घेता लवकरच ते सन्मानाने नड्डा शहांच्या हाताने भाजपा कार्यालयात पक्षप्रवेश करतील. शशी थरूर खासदार आहेत , केरळातील राजघराण्यातील आहेत , त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंटमूळे सोशल इम्पॅक्ट होतो. थरूरमागे देशभर एक जबरदस्त फॅन फोलोईंग आहे. काँग्रेसच्या लोकांमध्ये तो आयकॉन आहे. जेव्हा हे लोकं त्यांच्या एकूण पॉलिटिकल आयडॉलॉजी पेक्षा वेगळं, अनपेक्षित असं वागतात तेव्हा त्यांच्या समर्थक लोकांची अर्धी शक्ती गळून पडते.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

युद्धजन्य परिस्थितीमध्ये योग्य वेळ साधणे अत्यंत महत्वाचे असते. आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेल्या पाकिस्तानला कर्जाचा हफ्ता भरणे सुद्धा शक्य नव्हते. अमेरिकेच्या कृपेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही संस्था पाकिस्तानला कर्जाचा हफ्ता भरायला वेळ द्यायला तयार झाली होती. जोडीला त्यांना नवीन कर्ज सुद्धा देण्याची त्यांची तयारी होती. पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बरोबर आज 9 मे रोजी एक अतिशय महत्वाची बैठक होती, ज्यात त्यांना एक 'बेल-आउट' पॅकेज मिळणार होते आणि हे भारताला माहीत होते.त्यामुळे भारताने 8 मे सकाळपासूनच भारताने पाकिस्तानवर अनेक ड्रोन हल्ले चढवले. या हल्ल्यांमुळे असिम मुनीरवर असा काही दबाव निर्माण झाला, की फक्त 24 तासही त्याला वाट बघणे अशक्य होऊन बसले आणि आजच भारतावर हल्ला करायची झकमारी त्याला करावी लागली!आता भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला तंबी दिली आहे की त्यांनी पाकड्यांच्या कटोऱ्यात भीक घालू नये! 'पाकिस्तानला पैसे देणे म्हणजे भारताविरुद्ध युद्धाला फायनान्स करणे असेच आम्ही मानणार' असा थेट इशारा भारताने दिला आहे!! थोडक्यात आता पाकिस्तानला आर्थिक दृष्ट्‍या पूर्ण खड्ड्यात घालूनच आपण थांबणार आहोत.

🔽


ree

ree

ree

ree

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page