top of page
  • dhadakkamgarunion0

desk of abhijeet rane

*ABHIJEET RANE (AR)*

उध्दव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत असा आरोप करून राज ठाकरेंनी अचानक खळबळ माजवली.त्यामुळे पुढे ठाकरे विरूध्द ठाकरे ही लढाई जुंपणार आहे.तसेच सत्ता लालसेपोटी हे दोन बंधू आणखीन किती वार-पलटवार करणार? हाही एक न सुटणारा प्रश्न आहे.


*ABHIJEET RANE (AR)*

उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे शिवसेना भवनांत सैनिकांना भेटत आहेत.शाखांनाही भेटी सुरू आहेत.अर्थात त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण. परंतु त्यांच्या प्रयत्नान मुंबई व ठाणे मनपात सत्ता मिळणे कठीण आहे. गेल्या काही दिवसांतील त्यांच्यावरील चिखलफेकीनंतर अशक्य वाटत.

*ABHIJEET RANE (AR)*

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी किती विलंब लागत आहे ह्याचे दिवस विरोधी पक्षांकडून मोजले जात आहे. पण एवढा विलंब होऊनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाढलेले पाठबळ दिसत नाही तसेच त्यांची कार्यपध्दतीही वाखाणण्याजोगी ठरत आहे.

*ABHIJEET RANE (AR)*

मातोश्री पर्वानंतर आता मुंबईत शिवतीर्थ शिंपडले जाणार आहे.राज ठाकरेंना सद्या प्रकृतीपायी राज्यभर दौरे शक्य नसले तरीही त्यांच्या दूरचित्रवाहिन्यांवरून मुलाखतींमुळे ते चर्चेत आहेत.किती काळ? त्यांची उपयुक्तता संपेपर्यंत का? या प्रश्नांची उत्तर सद्या मिळणार नाहीत.


*ABHIJEET RANE (AR)*

बॉलिवूडमधील कलाकारांवर दहशत बसविण्यासाठी पंजाबातील लॉरेन्स बिश्नोई नामक गु़ंड उपटला आहे.त्याने सुपरस्टार सलमान खानला धमकी दिली. भयभीत सलमानने आयुक्तांकडे शस्त्रपरवान्यासाठी धाव घेतली पण पूर्वकर्म आड तर येणार नाहीत ना?

3 views0 comments

Comments


bottom of page