top of page

Desk of abhijeet rane

dhadakkamgarunion0

*ABHIJEET RANE (AR)*

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की "सचिन वाझे प्रकरणात एका मंत्र्यांचा राजीनामा अपेक्षित" पण शरद पवार साहेबांकडून एकदा केवळ क्लीन चिट नव्हे तर वाझे प्रकरण सूज्ञपणे वेळीच योग्य कारवाई करून हाताळल्याबद्दल अनिल देशमुख यांची पाठ जाहीरपणे थोपटल्यावर त्यांचा राजीनामा कोण कसा घेणार?

मग.. राजीनामा कोणाचा ?

शरद पवार यांनी शिवसेनेच्या अनिल परब या मंत्र्यांविरूद ते अनिल देशमुख यांच्या गृह खात्यात हस्तक्षेप करतात असा जाहीर आरोप केल्याचे या क्षणी टीव्ही 9 या न्यूज चॅनेलवर दाखवीत आहेत.

मग शरद पवार साहेब अनिल परब यांचा राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणणार काय?

पोलीस अधिका-यांच्या बदल्या, बढत्या फक्त फक्त फक्त शरद पवार साहेबांकडून आदेश घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून केल्या जातात हे जगजाहीर असताना अनिल परब यांच्याकडून झालेल्या अधिक्षेपाची परिणती म्हणून पवार साहेब त्यांचा राजीनामा घेतील अशी शक्यता चंद्रकांत दादा पाटील यांना वाटत असेल काय? उद्धव ठाकरे यांचे "ब्रेन" किंवा "मार्गदर्शक" जर अनिल परब असतील तर मग त्यांचा राजीनामा उद्धवजी कसा घेतील? हा प्रश्न निर्माण होतो. मग चंद्रकांतदादा ज्याच्या राजीनाम्याबद्दल बोलतात ते मंत्री कोण हे रहस्य कायम राहणार!!


 

*ABHIJEET RANE (AR)*

शिवसेनेतील संघटनात्मक बाबतीत मिलिंद नार्वेकर हे सदैव "संकटमोचका"च्या भूमिकेत होते.. असतात.. पण सचिन वाझे प्रकरणात उद्धवजींचा "गजेंद्र मोक्ष" करण्यासाठी अद्याप मिलिंद नार्वेकर पुढे सरसावलेले का नसावेत?


 

*ABHIJEET RANE (AR)*

अमृता फडणवीस यांनी ट्विट करून आत्तापर्यंत फक्त कुजबूज स्वरूपात असलेला "अंबानींना दहशतवाद्यांच्या नावाखाली घाबरवून खंडणी वसूल करण्याचा कट होता" हा आरोप जाहीरपणे व्यक्त करून एन आय ए तपासाला नवी दिशा दिली आहे याबद्दल अमृता फडणवीस यांना श्रेय द्यावे लागेल. अंबानींना उद्देशून लिहिलेले पत्र ज्या तथाकथित दहशतवादी संघटनेच्या नावावर लिहिले होते त्या नावाची दहशतवादी संघटना अस्तित्वात नाही हे या आधीच एन आय ए ने जाहीर केले आहे. पण ते पत्र कुणी लिहून ठेवले, हे जाहीर झालेले नाही. दहा हजार कोटींची खंडणी अंबानींकडून उकळण्याचे हे कारस्थान होते या अफवांवर एन आय ए चा खुलासा देखील व्हायचा आहे. अमृता फडणवीस आणि कंगना राणावत या दोघींची ट्विटरवरील विधाने धक्कादायक असतात पण विचार करावाच लागेल अशी असतात हे मान्य करावेच लागेल !!


 

*ABHIJEET RANE (AR)*

हेमंत रणपिसे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रसिद्धीची सूत्रे स्वीकारल्यानंतर रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंग अशा डझनभर केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना प्रसिद्धीपत्रकांच्या संख्येत मागे टाकले आहे. दिवसभरात किमान तीन प्रसिद्धीपत्रके प्रसिद्ध होणारे ते एकमेव केंद्रीय मंत्री असावेत. यापूर्वी रामदास आठवले यांच्या विनोदी कविता प्रसिद्ध होत्या आता हेमंत रणपिसे यांच्या नावासह भारतातील प्रत्येक घटने/ दुर्घटनेनंतर प्रसिद्ध होणारी रामदास आठवले यांची पत्रक मालिका हा चर्चेचा विषय झाला आहे. पत्रकातील भाषा, आशय, मांडणी आणि पत्रकाखालील ठळक अक्षरातील "हेमंत रणपिसे" यांचे नाव यामुळे पत्रक रामदास आठवले यांचे असले तरी लक्षात येतात/राहतात ते हेमंत रणपिसे यात शंकाच नाही. हेमंत रणपिसे यांना रामदास आठवले त्यांच्या भाजपातील कोट्यातून आमदार कधी करणार ते बघायचे. अभिनंदन हेमंतजी !!


 

*ABHIJEET RANE (AR)*

अखेर झाली / करावी लागली ती "बदली" आधीच केली असती तर.. तर.. पण आता हा प्रश्न विचारून काय उपयोग? विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस आणि सत्तारूढ आघाडीचे पितामह शरद पवार साहेब या दोघांना 50/50 % श्रेय आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता उरला नाही. परमवीर सिंग यांच्यासह अनेकांची एन आय ए कडून चौकशी होऊ शकेल पण अटक ज्युनियर अशा दोन तीन अधिका-यांना होईल त्यानंतर हा विषय थंड होऊ लागेल. नवीन विषय.. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका.. गरम होत जाईल. वाझे प्रकरणात आरोपपत्र दाखल करून एन आय ए अन्यत्र जाईल. तारखांवर तारखा पडण्याचा सिलसिला वर्षानुवर्ष चालू राहील. परमवीर सिंग यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून दूर करणे आणि रिपब्लिकन चॅनेलचे प्रमुख अर्नब गोस्वामी यांच्यावरील कारवाईचा सूड घेणे हे दोन हेतू साध्य झाल्यावर आता ह्या प्रकरणात केंद्र सरकारला किती स्वारस्य राहील याबद्दल शंका वाटते. पाहूयात काय कसे घडते.


 
 
 

Opmerkingen


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page