top of page
  • dhadakkamgarunion0

desk of abhijeet rane

*ABHIJEET RANE (AR)*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व १६ आमदारांच्या सुनावणीकडे लक्ष लागले.शिवसेनेसह विरोधी पक्ष त्यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त करतोय त्यामुळे राज्य सरकारचे भवितव्य काय?या प्रश्नांचे उत्तर शोधताना मिडीयाकर्मी बातमीपेक्षा स्वत:च पंतगबाजी करत आहे.

 

*ABHIJEET RANE (AR)*

शरद पवार मिडीयासमोर आले पण त्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या संभाजीनगर नामांतर निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शिवसेनेच्या पडत्या काळांत काँग्रेस व राष्ट्रवादीचीही साथ सुटते की काय? अशी अनिश्चीत स्थिती निर्माण झाली आहे.

 

*ABHIJEET RANE (AR)*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें मंत्रिमंडळ विस्ताराकडे सरकत असतानाच राज्य सरकार गडगडणार असल्याची शंक्यता व्यक्त होत आहे.त्यासाठी कोणताही आधार दिला जात नाही किंवा कोणताही नेता रणनिती सांगत नाही.तरीही साप म्हणून भुई थोपटल्याचा प्रकार केला जातोय.

 

*ABHIJEET RANE (AR)*

गोव्यात काँग्रेस पक्ष फुटणार त्यांचे आठ आमदार भाजपात जाणार अशा बातम्या आहेत पण त्याबाबत राजकीय स्तरावरं भाजपकडून दुजोरा मिळत नाही. मग अशा बिनबुडाच्या बातम्या दूरचित्रवाहिन्या दाखवतात तरी कशाच्या आधारे? की टीआरपीसाठी अशी निराधार वृत्त देताहेत.

 

*ABHIJEET RANE (AR)*

गोव्यातील ज्येष्ठ काँग्रेस आमदार दिंगबर कामतांचे नाव भाजपात जाऊ इच्छिणाऱ्या फुटीर काँग्रेस आमदारांच्या यादीत आले आहे.गेली दहा वर्ष सातत्याने कामतांचे नाव येते आहे. पण ते अजूनही काँग्रेसमध्ये आहेत. मग ह्यावेळी तरी ते नक्की भाजपात प्रवेश करणार का?

 

*ABHIJEET RANE (AR)*

अशोक चव्हाणांसह दहा काँग्रेस आमदारांचा गट भाजपात जाणार असल्याच्या वृत्तामुळे काँग्रेस नेते पुन्हा त्रस्त झालेत. गुप्तचर व मिडीयाकर्मींकडून तपासून घेतल्यानंतरही सतर्कता तरी किती बाळगायची? असा सवाल काँग्रेस नेतेमंडळीं परस्परांना करत आहेत.

3 views0 comments

Comments


bottom of page