top of page
  • dhadakkamgarunion0

*@ABHIJEETRANE(AR)*

🖋️*@ABHIJEETRANE(AR)*

"राज्याचा अर्थसंकल्प ना लाभदायक आहे ना हानीकारक" या शब्दात मी माझी प्रतिक्रिया विविध न्यूज चॅनेल्सच्या प्रतिनिधींना दिली आहे आणि त्या विधानावर मी कायम आहे. दैनंदिन जीवनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होणार नाही असा धोरणात्मकदृष्ट्या समतोल आणि विद्यमान परिस्थिती "जैसे थे" ठेवणारा अर्थसंकल्प सादर करून महाआघाडी सरकारने लोकांना खुष केले नसले तरी नाराजही केलेले नाही. अर्थमंत्री अजितदादा पवार यांना धन्यवाद.. अभिनंदन मात्र मी करणार नाही कारण "नवे" "हवे" असे खूप काही अजितदादांकडून मला अपेक्षित होते. विशेषतः माझ्या कामगार आणि श्रमिक बंधूंसाठी !!

www.abhijeetrane.in


 

🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*

अंबानी याच्या घरासमोरील संशयित स्कॉर्पिओ गाडीचा तपास केंद्रीय गृह खात्याने एन आय ए या केंद्र सरकार च्या अखत्यारीतील एजन्सीकडे महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारच्या इच्छेविरुद्ध सोपवला पण स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन याच्या संशयास्पद मृत्यूचा तपास मात्र महाआघाडी सरकारच्या एटीएस कडे कायम ठेवला हे कोडे काही केल्या उलगडत नाही. स्कॉर्पिओच्या घटना शृंखलेत मनसुख हिरेन हा स्कॉर्पिओ इतकाच महत्वाचा दुवा होता आणि त्याचा मृत्यू संशयास्पद होता ही बाब स्कॉर्पिओचे कोडे उलगडताना एन आय ए ला तपासावी लागणार नाही का? मग फक्त गाडीचाच तपास एन आय ए कडे हे कसे लक्षात येत नाही.

www.abhijeetrane.in


 

🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*

ज्यांनी कोरोनावरील लस घेतली किंवा घेत आहेत आणि ज्यांचे लस घेतानाचे फोटो प्रिंट इलेक्ट्रॉनिक सोशल मिडीयावर झळकत आहेत तो एक नवाच "व्हिआयपी" क्लास निर्माण झाला / होतो आहे. लस घेण्यापूर्वी नर्सच्या आधी फोटोग्राफर अरेंज करण्याची खबरदारी घ्यावी लागते आहे..!

www.abhijeetrane.in


 

🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ काळ रखडणार हे माझे भाकीत खरे ठरले याचा मला खेद आहे. सर्व राज्यांकडून आरक्षण विषयक मते जाणून घेऊन मग महाराष्ट्राच्या विधेयकावर सुनावणी होणार म्हणजे 2021 मध्ये काहीच घडणार नाही तर 2022 मध्ये कदाचित कदाचित कदाचित सुनावणीस प्रारंभ होईल. दरम्यान दरम्यान मराठा आरक्षणावरील अंतरीम स्थगिती उठविणार काय? खंडपीठ पाच न्यायाधीशांचे असो अथवा अकरा.. महाराष्ट्रातील मराठा तरूणांना आरक्षणावरील स्थगिती उठविणार काय? याचे उत्तर हवे आहे. त्यासाठी 2022 पर्यंत वाट पहावी लागणार ? होय! दुर्दैवाने होय ! जोपर्यंत सर्व राज्यांची आरक्षणावरील मते सर्वोच्च न्यायालयात दाखल होत नाहीत तोपर्यंत सुनावणी विद्यमान मराठा आरक्षण विधेयकावर तांत्रिक औपचारिक आणि अनिर्णित स्वरूपात केवळ चिकित्सक विश्लेषणात्मक राहील ज्यात स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात काही अनुकूल वातावरण दिसत नाही. महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार प्रामाणिक प्रयत्न करणार पण स्थगिती कशी उठविणार ? याचे उत्तर कोणाकडे.. अगदी विरोधी पक्षांकडे देखील नाही !!

www.abhijeetrane.in


 

🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*

"राफेल विमान कंपनीच्या मालकाचे हेलिकॉप्टर अपघातात निधन" ही बातमी याक्षणी मी न्यूज चॅनेलवर पाहतो आहे. काय योगायोग आहे पहा. ज्याने युद्धात शत्रूराष्ट्राच्या शेकडो सैनिकांवर बाँब वर्षाव करून त्यांना ठार मारता येईल अशी लढाऊ विमाने जगभरातील राष्ट्रांना पुरवली तो स्वतः एका साध्या हेलिकॉप्टर अपघातात ठार झाला. व्यक्ति कितीही समर्थ समृद्ध असो जेव्हा त्याचा मृत्यू नियती निहित करते तेव्हा त्याला ना त्याचे सामर्थ्य वाचवू शकते ना समृद्धी !

www.abhijeetrane.in


6 views0 comments

Comments


bottom of page