top of page

*ABHIJEET RANE (AR)*

dhadakkamgarunion0

*ABHIJEET RANE (AR)*

हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटणे स्वाभाविक आहे. परंतु त्यामुळे त्यांचे कार्यक्रम रद्द होताच त्याचे राजकारण विरोधक का करतांत?त्यांच्या राजकारणामुळे जादू होऊन मुख्यमंत्री वा मंत्री पूर्वनियोजीत कार्यक्रमासाठी पोहोचतील का?मग हा उपदव्याप कशाला?


 

*ABHIJEET RANE (AR)*

राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे कार्यक्रम खराब हवामानामुळे रद्द होतात ही बाब समजू शकते पण अन्य मंत्री रस्ते मार्गे प्रवास करतांत एकाच दिवशी गच्च कार्यक्रम घेतात आणि मग ते रद्द करत राहतांत. मंत्री असे का वागतांत? हेच सर्वसामान्यांना समजत नाही.

 

*ABHIJEET RANE (AR)*

बदलीप्रकरण सर्वच मंत्र्यांना तापदायक ठरते. लोकप्रतिनिधीं बदलीसाठी शिफारस करतांत. त्यामुळे बदली होते.नेमका मंत्र्यांच्या मतदारसंघातील जवळचा कार्यकर्ता त्यात पिचला जातो. मग मंत्री हैराण होतात हे रोजचे दृश्य आहे.पण त्यात अर्थकारण आहे म्हणे.

 

*ABHIJEET RANE (AR)*

आमदार अपात्रतेचे प्रकरण फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हाताळताहेत. त्रुट न राहण्याची ते काळजी घेत आहेत. परंतु दिवसभरात त्यांचा अर्धावेळ याकामी जात असल्यामुळे कामांचा वेग मंदावत आहे.


 

*ABHIJEET RANE (AR)*

मुख्यमंत्र्यांनी मालाड व चारकोपमधील त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे न स्विकारता चर्चेने मार्ग काढला.त्यामुळे कार्यकर्ता बेहद्द खुश झालायं. मुख्यमंत्र्यासाठी सर्व काही माफ म्हणून ते परत कामालाही जुंपले. याला म्हणतात नेता असे ते कौतुकाने सांगत आहेत.

 

*ABHIJEET RANE (AR)*

अविश्वास ठराव फेटाळला जाताच चवताळलेल्या विरोधी पक्षांनी सभागृह सोडले. परंतु बाहेर मिडीयापुरते नुसतेच तोंडदेखले आरोप करणाऱ्या विरोधकांनी सभागृहांत एकही ठोस पुरावा पुरवा पंतप्रधान किंवा अन्य कुणाबद्दल दिला नाही. मग त्या अविश्वास प्रस्तावाचे गांभीर्य काय राहिले?

 

 
 
 

Comentários


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page