*@ABHIJEETRANE(AR)*
मुच्छड पानवाल्याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अंमली पदार्थ पुरविल्याच्या आरोपाखाली केलेली अटक अनपेक्षित नाही नाही नाही..!! मुच्छडच्या लोकप्रियतेचे "रहस्य" साध्या विड्याच्या पानात नसून त्याच्या "विशेष" पानसेवेत आहे हे "चाहत्यां"ना आणि मिडीया सकट तपास व कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांना ठाऊक होते. किंबहुना माझा जाहीर आरोप म्हणा किंवा संशय समजा हा आहे की "ज्या विशिष्ट लोकप्रिय.. त्या त्या परिसरात "ब्रँड" झालेल्या.. तथाकथित पान 'रसिकां'ची संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत झुंबड गर्दी उडणा-या.. 'पानशाॅप्स' मधून आता अटक झालेल्या 'मुच्छड' प्रमाणेच अंमली पदार्थ युक्त पान-विडे किंवा पान मसाल्याच्या नावावर थेट अंमली पदार्थ विकले जातात. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने तपास केला तर बहुसंख्य पानवाले अंमली पदार्थ विक्रीच्या रॅकेटचा भाग आहेत हे उघडकीस येईल यात शंका नाही. असे हजारो "मुच्छड" कोपर्या कोपर्यावर आहेत फक्त 'एनसीबी'ने 'तिसरा डोळा' उघडायला हवा!
www.abhijeetrane.in

◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
भंडारा येथील अग्निकांडानंतर महाराष्ट्रातील अग्निसुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 90% आस्थापनांनी 'फायर ऑडिट' केलेले नसावे. या संदर्भात जिथे जिथे सार्वजनिक स्वरूपात लोकांचा वावर , वापर, रहिवास असतो तिथे चौकशी आणि कारवाई करण्यासाठी संबंधित यंत्रणांना भाग पाडण्यासाठी दै. मुंबई मित्र आणि दै.वृत्त मित्र ही माझी मराठी व हिंदी दैनिके , अभिजीत राणे यूथ फाऊंडेशन यांच्या माध्यमातून "अग्नीपरिक्षा" ही मोहीम सुरू करीत आहे. हाॅस्पीटल्स, हाॅटेल्स, थिएटर्स, शॉपिंग मॉल्स, मंदिरे, हाऊसिंग काॅम्लेक्स, शाॅप्स, लोकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असणारी सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये यांचे फायर ऑडिट झाले आहे की नाही आणि अग्निशमन यंत्रणा शासकीय निकष, नियम, अटींनुसार परिपूर्ण आहे की नाही याची माहिती गोळा केली जाईल आणि ज्यांनी कायदेभंग केला असेल त्यांच्या निष्काळजीपणाचे व धोकादायक अवस्थेचे गौप्यस्फोट प्रिंट इलेक्ट्रॉनिक सोशल मिडीयावरून केले जातील. "अग्निपरिक्षा" या नावाने महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नगरात, महानगरात चालवली जाईल. आपल्यापैकी प्रत्येक जण या 'अग्निपरिक्षा' मोहीमेत स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊ शकेल. शोधक पत्रकारितेच्या माध्यमातून किंवा माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ही अग्निशमन उपाय योजनांची, फायर ऑडिटची तसेच कशाप्रकारे धोकादायक अवस्थेत संबंधित वास्तू आहेत याची माहिती कुणीही नागरिक मागू शकतात आणि दिलेली माहिती किंवा माहिती दिली नाही तर दिली नाही असे नमूद करून तुम्ही व्हाॅटस्ऐपने 9892850897 या मोबाईल क्रमांकावर कळवू शकता. अतिशय गांभीर्यपूर्वक, प्रामाणिकपणे
आणि प्रसंगी धोका पत्करून ही 'अग्निपरीक्षा' मोहीम आम्ही चालवणार आहोत. 'अग्निपरिक्षा' मोहीमेत माहिती देणा-या प्रत्येक स्वयंसेवकाला "फायर वाॅरियर" म्हणून सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात येईल.
www.abhijeetrane.in

◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
मी चार दिवसांपूर्वीच मेसेज केला होता की ..
केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाच्या कोंडीतून स्वतःची सुटका करून घेणार.. काय तसेच घडते आहे ना? दाद चाहुंगा आप से !!
www.abhijeetrane.in

◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
मनसे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे हा निर्णय स्वागतार्ह..! मनसेचे उमेदवार निवडताना राज ठाकरे यांनी मनसेच्या निष्ठावंत इच्छुकांपेक्षा, प्रसंगी त्या निष्ठावंतांची नाराजी पत्करून...
जे अपक्ष म्हणून उभे राहीले तरी नक्कीच "स्वबळावर" निवडून येतील अशा विविध पक्षातील फुटीर विद्रोही मातब्बर अथवा धनाढ्य उमेदवारांना तिकीटे द्यावित कारण त्यातून मनसेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचे विविध महापालिकेतील संख्याबळ वाढेल आणि मनसेचे बळ घटल्याचा प्रचार हाणून पाडता येईल ज्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होईल. एम आय एम, वंचित, अपक्ष आणि मनसे यांच्याकडून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे
किती उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत पाडले जातात यावर विधानसभा निवडणुकीत भाजपा या पक्षांबाबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, उघड किंवा गुप्त सहकार्य करण्याबद्दल भूमिका घेऊन पाठीशी उभे रहायचे की पोटाशी घ्यायचे यावर निर्णय घेईल हे या महाआघाडीतील घटक पक्षांचे मतविभाजन घडवून आणणा-या एम आय एम, वंचित, मनसे, रिपब्लिकन गटातटातील घटकांनी लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत व्युहरचना केली पाहिजे.
ww.abhijeetrane.in

◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
महाराष्ट्र सरकारने ऑफीशियली जाहीर केले आहे की :
अंडी आणि चिकन बिनधास्त आणि मनसोक्त खा कारण चांगले शिजवलेले चिकन आणि व्यवस्थित उकडलेले अंडे खाल्ले तर.. कोंबडी बर्ड फ्यू बाधित असली तरी मनुष्यप्राण्यांना 'बर्ड फ्ल्यू होत नसल्याने काळजी करण्याचे कारण नाही !
महाराष्ट्र सरकारकडून दिशाभूल तर केली जात नाही ना ?
बहुतांश अंडी आणि कोंबडी विक्रेते 'बारामती' कृषी उत्पादन शृंखलेत सहभागी आहेत असे चिकन शाॅप्स वरील पाट्यांवरून जाणवते त्यामुळेच तर ही क्लीन चिट नसेल ना?
मी व्यक्तिशः बर्ड फ्ल्यू जाईपर्यंत चिकन किंवा अंडी खायची नाहीत असे ठरवले आहे.
महाआघाडीतील कोण मंत्री नेते लोकप्रतिनिधी शासकीय क्लिन चिट लक्षात घेऊन चिकन आणि अंडी खाताना दिसतात काय यावर लक्ष ठेवा..!
www.abhijeetrane.in

Commentaires