top of page
Search

🖋️ अभिजीत राणे लिहितात:

  • dhadakkamgarunion0
  • Oct 29, 2024
  • 2 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात:

ज्या प्रकारे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर स्थानिक सत्ता संघर्षातून स्थानिक विरोधक हिंसाचार आणि जीवघेणे हल्ले करीत आहेत आणि रोखायला पोलीस हतबल अकार्यक्षम ठरत आहेत.. मला साधार भिंती वाटते की प्रचार काळात एखाद्या उमेदवाराची हत्या होईल, असंख्य कार्यकर्ते जखमी होतील. पण लक्षात कोण घेणार?

⬇️

🖋️ अभिजीत राणे लिहितात:

राजकीय पक्ष मतदारांना कसे गृहित धरुन, मूर्ख समजून अनैतिक अनैसर्गिक अनाकलनीय अविश्वसनीय निर्णय घेतात याचा पुरावा म्हणजे भाजपाने आपले उमेदवार शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर उभे करणे, उबाठा - शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेसने अशीच जागांची अदलाबदल उमेदवार आपले असताना करणे आहे. आपण काय करू शकतो? नुसत्या सोशल मीडियात पोस्ट टाकण्या पलीकडे ?

⬇️

🖋️ अभिजीत राणे लिहितात:

वर्षानुवर्षे खासदारकी, आमदारकी पुनः पुन्हा भोगलेले पक्षनेते उमेदवारी नाकारली म्हणून बंडखोरीच्या धमक्या देतात, फॉर्म भरतात हे पक्षनेतृत्वाला केलेले ब्लॅक मेल आहे. वडील तीन वेळा खासदार, मुलगा दोन वेळा आमदार तरी तिकीट नाकारले म्हणून ढसढसा रडतो हेही ब्लॅक मेल नाही कां? या नीच स्वार्थासाठी आपल्याच पक्षाचा विश्वासघात करणाऱ्या बंडखोरांना मतदारांनीच नाकारून धडा शिकविण्याची वेळ आली आहे.

⬇️

🖋️ अभिजीत राणे लिहितात:

राजकीय पक्षांनी उमेदवारी दिलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करताना आपल्या संपत्तीची जी माहिती दिली आहे त्यावरून अधिकृत पक्षांचे अधिकृत सर्व उमेदवार किमान काही कोटींचे , अपवाद नाही, धनी आहेत हे एक्स्पोझ झाले आहे. गोरगरिबांची आणि शोषित वंचित पीडित जनतेच्या सेवेसाठी असल्याचा दावा करणाऱ्या सहा मुख्य पक्षांचे एकूण एक उमेदवार लक्षाधीश देखील नाहीत थेट कोट्याधीश कसे? तुम्हाला नाही पडत हा प्रश्न?

⬇️

🖋️ अभिजीत राणे लिहितात:

मुंबईत विविध पक्षांच्या दहा जागा अशा आहेत की जिथे केवळ त्या पक्षाचा नव्हे तर विशिष्ट उमेदवाराचा बालेकिल्ला आहे आणि १०० टक्के तो निवडून येतोच. त्यापैकी एक नाव आहे: मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार! सर्व सामान्य लोकांशी सदैव चैतन्यपूर्ण संवाद, मधमाशांच्या पोवळ्या सारखी सुबद्ध आखीवरेखीव तळागाळापर्यंत पोचलेली संघटनात्मक संरचना आणि माणूस म्हणून जगतानाचा सार्वत्रिक भलेपणा ही आशिष शेलार यांच्या लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या लोकप्रियतेची वैशिष्ट्ये आहेत. आ. आशिष शेलार यांना हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही आपल्या सोबत आहोत हे वचन!

⬇️






 
 
 

Recent Posts

See All
🖋️ अभिजीत राणे लिहितात

🖋️ अभिजीत राणे लिहितात भारतातील सर्वात लोकप्रिय माणूस -भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे, हा भारतीय जनतेच्या गळ्यातला ताईत बनला आहे. कारण...

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page