top of page

हा मेसेज सेव्ह करून ठेवा नंतर माझे अचुक प्रेडीक्शन केल्याबद्दल अभिनंदन करा !

  • dhadakkamgarunion0
  • Dec 21, 2020
  • 3 min read

*@ABHIJEETRANE(AR)*

हा मेसेज सेव्ह करून ठेवा नंतर माझे अचुक प्रेडीक्शन केल्याबद्दल अभिनंदन करा !

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडी करून एकत्र निवडणुक लढणार नाहीत नाहीत नाहीत! शिवसेना स्वबळावर एकट्याने स्वतंत्रपणे लढेल. भाजपा देखील मनसेशी युती करणार नाही नाही नाही! काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात काही जागी तडजोड तर अनेक जागी मैत्रीपूर्ण लढत होईल. बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांची संख्या आजवरच्या तुलनेत सर्वाधिक असेल. विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त अनधिकृतपणे अधिकृत माहिती.. सेव्ह करा हा मेसेज .. पुन्हा सांगतो!!

ree


*@ABHIJEETRANE(AR)*

मेट्रो कार शेड कांजूरमार्गला शिफ्ट करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे पण पण पण.. आता नेहमीप्रमाणे.. उद्धव ठाकरे यांचे प्रश्न सोडविण्यातील अपयश जगापुढे सिद्ध झाल्यानंतर आता स्वतः संकटमोचक अवतार धारण करीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मेट्रो कार शेड पेचप्रसंग सोडविण्यासाठी साक्षात शरद पवार साहेबांनी मध्यस्थी करणार असल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार साहेबांचे कधी मित्र - कधी शत्रू , कधी शिष्य - कधी गुरू , कधी भाऊबंदकी तर कधी बंधूप्रेम , कधी तडजोड तर कधी सौदा, कधी गळेपडूपणा तर कधी गळेकाटूपणा अशी अशी अशी परस्परविरोधी आणि / किंवा परस्परपूरक नातीगोती, चालीरिती, प्रतिबद्धता-शह- प्रतिशह- काटशह असतो शिवाय वरून जे दिसते ते आतून नसते आणि आतून जे वाटते ते बाहेर कळत नाही त्यामुळे त्यामुळे त्यामुळे जर जर जर शरद पवार साहेबांनी स्वतःहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क संवाद चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला असेल / आहे तर तर तर नक्कीच समजून चला की या आधीच पवार साहेबांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सूचक सांकेतिक संवाद झाला आहे आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार साहेबांनी परस्परांना संभाव्य उभयपक्षी "विन् विन् " सिच्युएशन कशी असेल याचा फाॅरम्युला तयार करण्यासाठी कुणावर तरी जबाबदारी सोपविलेली देखील असू शकते .. शरद पवार साहेबांना भाजपा मध्ये नितीन गडकरी जवळचे आहेत ते या प्रकरणात मध्यस्थ असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अर्थात अर्थात जो काही विन् विन् फाॅरम्युला मोदी आणि पवार ठरवतील त्याला देवेंद्र फडणवीस यांनी मोदी यांना आणि उद्धव ठाकरे यांनी पवारांना मूक किंवा मुखर संमती दिल्याशिवाय तो जाहीर केला जाणार नाही हे तेवढेच नक्की नक्की नक्की !!

ree


*@ABHIJEETRANE(AR)*

पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने महाआघाडी सरकार / मंत्रीमंडळातून मधून बाहेर पडून बाहेरून पाठींबा द्यावा ही घेतलेली / गांधी परिवारासमोर मांडलेली कल्पना राहुल गांधी यांना पूर्णतः आणि सोनिया गांधींना अंशतः मान्य आहे फक्त तसे केले तर मंत्रीपदाच्या मोहाने कोण कोण मंत्री किंवा आमदार राजीनामे देऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीत कायमचे जातील आणि बहुसंख्य काँग्रेस नेत्यांना / कार्यकर्त्यांना महाआघाडी सरकार मध्ये राहिल्याचा फायदा संघटना म्हणून काँग्रेसला काही होतो आहे असे वाटते का याची चाचपणी प्रभारी एच एस पाटील यांना करायला सांगितली आहे तिचा अहवाल प्रतिक्षित आहे. राहुल गांधी बंगाल, केरळ, तामिळनाडू विधानसभा निवडणुकां आधी अ भा काँग्रेस चे अध्यक्षपद स्वीकारतील आणि शिवसेनेच्या सहभागाने सरकार हा लागलेला "डाग" या इतर राज्यांतील निवडणुकांपूर्वी पुसून टाकण्यासाठी राहुल गांधी महाआघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेणे किंवा सरकार पडून भाजपाचे येऊ नये यासाठी बाहेरून पाठींबा देणे यातला एक पर्याय स्वीकारतील असे मला माझे दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार मित्र खात्री करून घेऊन सांगत आहेत. मला हे संभाव्य वाटते.

ree


*@ABHIJEETRANE(AR)*

महाराष्ट्रात कोरोना लस तमाम जनतेला फुकट मिळेल अशी घोषणा राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे किंवा अजितदादानी करण्यापूर्वी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कोरोना लस विनामूल्य देण्याचे जाहीर करण्याआधी..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनामूल्य लसीकरणाची घोषणा करून श्रेय घ्यावे असे पत्र मी उद्धवजींना आणि खा. संजय राऊत यांना पाठवले आहे. उत्तराची नव्हे तर तशा घोषणेची वाट पहातो आहे.

ree


*@ABHIJEETRANE(AR)*

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूद्वारी जाऊन दर्शन घेतले यामुळे चांगला मेसेज सद्भावनेने केलेली कृती असा गेला असला तरी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलन हे पंजाब मधील शीख धर्मीयांपुरते मर्यादेत असल्याचे सुचित केले असावे काय? ते मोदी आहेत ते जे काही करतात / बोलतात किंवा करत / बोलत नाहीत..

ते विचारपूर्वक आणि डावपेचात्मक भूमिकेतून करतात हे विसरून चालणार नाही!!

ree


*@ABHIJEETRANE(AR)*

गुगलवर मी चेक केले .. तुम्ही देखील करा .. ज्या रिलायन्स उद्योग समूहावर शेतकरी आंदोलकांनी बहिष्काराची घोषणा केली आहे..

त्याच 'रिलायन्स'ने 2019 च्या आर्थिक वर्षात आशियातील सर्वाधिक तब्बल 62 हजार कोटी रुपयांचा जीएसटी भरण्याचा विक्रम केला आहे.. ! करमुक्त शेती आणि शेतकरी यांच्यासाठी "रिलायन्स"चे हे योगदान स्वागतार्ह ?

की निषेधार्ह ?

ree



*@ABHIJEETRANE(AR)*

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध केल्यास आमदार निधीतून 25 लाख रुपये मिळतील हे खरे पण निवडणुक झाली तर गाव - खेड्यातील गोरगरीब सर्व मतदारांना मिळून उमेदवारांकडून एकत्रित किमान 25 लाख ते पाच कोटी रुपये मिळतात.. त्याचे काय? निवडणुक बिनविरोध झाली तर मतदारांना कोण कशाला "विचारील" ? कटू सत्य आहे जे दुर्लक्षित केले तर.. तर.. तर.. तुम्हाला काय वाटते? सैद्धांतिक बोलता येईल आणि ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून देण्यामागील सूचनेचे स्वागत आणि समर्थन करता येईल पण पण पण मतदारांच्या मानसिकता आणि हितसंबंधांचा विचार केला तर.. निवडणुका बिनविरोध केल्यास मतदारसंघांत पैसे सोडा पण आश्वासने देखील उमेदवार देणार नाहीत आणि मतदारसंघांत पैसे वाचतील ते सरपंचाच्या निवडणुकीत निवडून आलेले सदस्य देतील - घेतील! बिनविरोध निवड उमेदवारांना सोयीस्कर असली तरी मतदारांना अजिबात नाही नाही नाही नाही हे लक्षात ठेवा !!!

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page