top of page

शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी केला पलटवार

  • dhadakkamgarunion0
  • Aug 11
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी केला पलटवार

● शरद पवारांच्या या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मला कळत नाही की इतक्या दिवसांनंतरच शरद पवारांना राहुल गांधींना भेटल्यावरच याची आठवण का आली? राहुल गांधी ज्याप्रकारे सलीम-जावेदच्या कथा तयार करून त्यांच्या कथानकावर दररोज कपोलकल्पित आरोप करीत आहेत, तशीच अवस्था पवारांची तर झाली नाही ना?’ असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला. राहुल गांधी यांच्या 'मतचोरी'च्या आरोपांना शरद पवारांनी समर्थन दिल्याचे पाहून, फडणवीस यांनी पवारांच्या विधानाची राहुल गांधींच्या आरोपांशी तुलना केली आहे. शरद पवारांनी आपल्या विधानात निवडणूक आयोगावर विश्वास असल्याने त्या व्यक्तींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले असे स्पष्ट केले होते. याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना घेरले. ‘अनेक वर्षे राहुल गांधी जरी ईव्हीएमबद्दल बोलत होते, तरी शरद पवार बोलत नव्हते, किंबहुना त्यांनी अनेक वेळा स्पष्टपणे भूमिका घेतली होती की ईव्हीएमला दोष देणे अयोग्य आहे. पण आता ते जे काही बोलत आहेत, त्यावरून हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय,’ असे म्हणत फडणवीस यांनी पवारांच्या भूमिकेतील विरोधाभास दाखवून दिला आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

ree

 
 
 

Recent Posts

See All
महाराष्ट्राच्या भवितव्याचा नवा आराखडा; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा

🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ महाराष्ट्राच्या भवितव्याचा नवा आराखडा; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा ● राज्याच्या...

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page