top of page

विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर; गैरवापर होणार नसल्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ग्वाही

  • dhadakkamgarunion0
  • Jul 11
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर; गैरवापर होणार नसल्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ग्वाही

● पुर्वी नक्षलवाद, माओवाद हा जंगलांपुरता सिमित होता. मात्र नंतर त्याची पाळेमुळे शहरांमध्येही पसरायला लागली. राज्यघटना, संसद अमान्य करत लोकशाहीवादी व्यवस्थाच उलथून टाकण्याचा यांचा प्रयत्न आहे. अशा विचारसरणीच्या संघटनांना प्रचलित कायद्यानुसार प्रतिबंध घालणे अडचणीचे ठरत होते, म्हणून हा विशेष जनसुरक्षा कायदा आणल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या कायद्यानुसार कोणा एका व्यक्तीला अटक करण्याचे प्रावधान नाही. जर संघटनेवर बंदी आली आणि तो जर तिचा सदस्य असेल तरच अटक होईल. कुठलेही आंदोलन करण्याचा सर्वसामान्य जनतेचा अधिकार, सरकार विरोधात बोलण्याच्या अधिकार यावर या कायद्यामुळे गदा येणार नाही. पण जे संघटितरित्या राज्यघटनेने स्थापित व्यवस्थेला नाकारत आहेत त्यांच्यावर बंदी आणायला हा कायदा आपण आणत आहोत. या कायद्याचा कोणताही गैरवापर होणार नाही हे मी या सभागृहाला आश्वस्त करतो असेही फडणवीस म्हणाले आहेत.

©️ -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page