विलिनीकरणाबाबतच्या अफवांना मूख्यमंत्री फडणवीसांनी दिला पूर्णविराम
- dhadakkamgarunion0
- 14 hours ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
विलिनीकरणाबाबतच्या अफवांना मूख्यमंत्री फडणवीसांनी दिला पूर्णविराम
● महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर आपली परखड भूमिका मांडली. दिवंगत नेते अजित पवार यांच्याशी असलेले आपले वैयक्तिक आणि राजकीय संबंध अत्यंत घनिष्ठ होते, असे सांगत त्यांनी विलिनीकरणाच्या वावड्या फेटाळून लावल्या आहेत. विलिनीकरणासारखा मोठा निर्णय घेताना अजित पवार आपल्याला किंवा भाजपाला विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याबाबतच्या राजकीय चर्चांनी जोर धरला आहे. विशेषतः शरद पवार गटातील काही नेत्यांनी १२ फेब्रुवारी रोजी विलिनीकरण होणार होते, असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. काही लोक विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून विलिनीकरणाच्या तारखांबाबत कोणतीही अधिकृत माहिती सरकारकडे किंवा महायुतीकडे नसल्याचे त्यांनी सांगितले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments