top of page

राज्यात तंत्रक्रांतीची नांदी; ॲमेझॉनच्या गुंतवणुकीला मुख्यमंत्री फडणवीसांकडून हिरवा कंदील

  • dhadakkamgarunion0
  • Sep 24
  • 1 min read

Updated: Sep 29

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

राज्यात तंत्रक्रांतीची नांदी; ॲमेझॉनच्या गुंतवणुकीला मुख्यमंत्री फडणवीसांकडून हिरवा कंदील

● महाराष्ट्र आता जागतिक उद्योगांसाठी आकर्षणकेंद्र ठरत असून गुंतवणुकीच्या नव्या संधींनी राज्याची प्रगती गतीमान होणार आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस परिषदेपासून सुरू झालेल्या चर्चांचा ठोस परिणाम आता महाराष्ट्रात दिसू लागला आहे. जागतिक पातळीवर तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या ॲमेझॉनकडून राज्यात तब्बल ८.३ बिलियन डॉलर गुंतवणुकीचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस डेटा सेंटर चे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ॲमेझॉनच्या गुंतवणुकीसोबत सामाजिक उत्तरदायित्व निधी राज्याच्या प्रगतीस नवी दिशा देईल. याच कार्यक्रमात मोबाईल स्टेम लॅब उपक्रमांतर्गत भारतातील पहिल्या ‘थिंक बिग मोबाईल व्हॅन’चे उद्घाटनही करण्यात आले, जी मुंबईतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणार आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page