राज ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर
- dhadakkamgarunion0
- 4 hours ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
राज ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर
● सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांना निमंत्रण न मिळाल्यामुळे ही टीका होत असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात समाजाच्या सर्व स्तरांतील लोक आले होते. अनेकांना पहिल्यांदाच संघाचे कार्य जवळून पाहता आले. मात्र, ज्यांना या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण पोहोचले नाही, त्यांना आता त्याचे वाईट वाटत आहे. त्यांच्या याच दुःखामधून आणि असूयेतून ही टीका बाहेर येत आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की, सरसंघचालकांनी या दोन दिवसांत उपस्थित सर्व लोकांच्या शंकांचे निरसन केले. जे लोक वर्षानुवर्षे संघाबद्दल खोटा प्रचार करत होते, त्यांची दुकानं आता कायमची बंद होणार आहेत. त्यामुळेच आता या विरोधकांच्या पोटात मळमळ सुरू झाली असून ते अशा प्रकारे विधाने करत सुटले आहेत. हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय भीतीपोटी नाही, तर प्रेमापोटी यशस्वी झाल्याचेही त्यांनी नमूद केले. संघाचे विचार समजून घेण्याची गरज आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी भाषेचा वापर करणाऱ्यांना आता जनतेने ओळखले आहे. हा केवळ एका भाषेचा प्रश्न नसून राष्ट्रवादाशी जोडलेला विषय असल्याचे फडणवीसांनी ठणकावून सांगितले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments