top of page

मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; देवेंद्र फडणवीस यांनी दिली मंत्र्यांना कडक शब्दांत तंबी

  • dhadakkamgarunion0
  • Jul 31
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; देवेंद्र फडणवीस यांनी दिली मंत्र्यांना कडक शब्दांत तंबी

● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील मंत्र्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून काही मंत्र्यांच्या वादग्रस्त विधाने आणि कृतींमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याने, फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी सर्व मंत्र्यांना आता शेवटची संधी असून, यापुढे अशा चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा सज्जड दम दिला आहे. फडणवीसांनी स्पष्ट केले की, मंत्रिमंडळातील प्रत्येक सदस्याला जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येक शब्द आणि कृतीचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांनी यापुढे कोणताही मंत्री किंवा आमदार अशा प्रकारची चूक करणार नाही, याची खात्री करण्याचे निर्देश दिले. भविष्यात अशा घटना घडल्यास त्या मंत्र्यावर कोणती कारवाई करायची, याचा विचार केला जाईल असेही त्यांनी सूचित केले. सध्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून जोर धरत आहे, अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page