मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक प्रचारशैली
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 1 min read
[ पंचनामा ]
==================
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक प्रचारशैली
● राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करण्याऐवजी थेट जनतेच्या विकासाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये बोलताना ते म्हणाले की, ‘‘मी कोणावरही टीका करण्यासाठी आलो नाही, तर तुमच्या शहराच्या आणि राज्याच्या उज्ज्वल भविष्याची ‘ब्लू प्रिंट’ घेऊन आलो आहे.’’ फडणवीस यांनी आपल्या सरकारने छोट्या शहरांसाठी आखलेला एक लाख कोटी रुपयांचा विकास कार्यक्रम आणि पुढील दृष्टी स्पष्ट केली. यावेळी त्यांनी जनतेला सकारात्मक दृष्टिकोनातून भाजपाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निवडणुकीच्या प्रचारात सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. त्यांनी कोणत्याही विरोधकावर थेट टीका करणे किंवा त्यांचे नाव घेणे टाळले. केवळ राज्य आणि केंद्र सरकारने केलेल्या विकासाचे काम आणि भविष्यातील व्हिजन लोकांसमोर मांडले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments