top of page

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे ध्येय

  • dhadakkamgarunion0
  • Aug 13
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे ध्येय

● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' पुढील पाच वर्षे अखंडपणे सुरूच राहणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. या योजनेसाठी आवश्यक निधीत योग्य वेळी वाढ केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही केवळ एक सरकारी योजना नसून, ती माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी दिलेली एक वचनपूर्ती आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याचे फडणवीस म्हणाले. 'लखपती दीदी' योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मोठ्या संख्येने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात यश आले आहे. यावर्षी आणखी २५ लाख महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

ree

 
 
 

Recent Posts

See All
महाराष्ट्राच्या भवितव्याचा नवा आराखडा; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा

🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ महाराष्ट्राच्या भवितव्याचा नवा आराखडा; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा ● राज्याच्या...

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page