top of page

महाराष्ट्राचा विकास आणि पूरस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी केली पंतप्रधान मोदींसोबत चर्चा

  • dhadakkamgarunion0
  • Sep 28, 2025
  • 1 min read

Updated: Sep 29, 2025

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

महाराष्ट्राचा विकास आणि पूरस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी केली पंतप्रधान मोदींसोबत चर्चा

● नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. याशिवाय, राज्यातील मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरस्थितीवर आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या अतोनात नुकसानीबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून राज्याला भरीव आर्थिक मदत करावी, अशी विनंती करणारे निवेदन त्यांनी सादर केले. पूर परिस्थिती आणि मदतीच्या मागणीसोबतच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांवरही पंतप्रधानांशी चर्चा केली. यामध्ये राज्यातील प्रस्तावित संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादन क्षेत्रासाठी आवश्यक सवलती आणि मुंबईतील काही महत्त्वाच्या जागेच्या हस्तांतरणाचे मुद्दे समाविष्ट होते. राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी या प्रकल्पांना केंद्राची मदत अत्यंत आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page