top of page

भाडेवाढ न करता एसी ट्रेन वाढविण्याचा विचार; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला पुढाकार

  • dhadakkamgarunion0
  • Jun 11
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

भाडेवाढ न करता एसी ट्रेन वाढविण्याचा विचार; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला पुढाकार

● प्रवासी सुरक्षिततेसाठी लोकलला बंद होणारे दरवाजे लावण्याचा विचार सुरू आहे. सोबतच एसी ट्रेन वाढविण्यात येणार आहेत, त्या देखील भाडेवाढ न करता, यावर देखील विचार सुरू आहे. काल जे घडले त्यातून निश्चितच बोध घ्यावा लागेल. केंद्र आणि राज्य सरकार मिळून याबाबत योजना आखेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडावीस यांनी दिली आहे. फडणवीस म्हणाले की, मेट्रो या अतिशय चांगल्या दर्जाच्या आहेत. मेट्रोत प्रवास करणाऱ्यांना एसी प्रवास, लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारा नागरिक दुय्यम नाही, त्यालाही त्याच सुविधा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. अश्विनी वैष्णव यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. तिकिट दर न वाढवता एसी लोकलचा प्रवास होईल यावर विचार सुरू आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी दरवाजे लावण्याचा विचार करण्यात येत आहे. कोणी म्हणाले, दरवाजे लावले तर लोक गुदमरतील. इतके तर सरकारला कळते ना की, कसे डिझाईन करायला हवे, असे म्हणत फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page