बांगूर नगरात दहीहंडीचा दणदणीत जल्लोष!
बांगूर नगर, गोरेगाव पश्चिम येथे भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक ५० चे नगरसेवक मा. विक्रम राजपूत यांच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२६* मोठ्या जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष तथा धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावून गोविंदा बांधवांचा उत्साह वाढविला. थरावर थर रचत गोविंदा पथकांनी अखेर दहीहंडी फोडत जल्लोष साजरा केला. संपूर्ण परिसर “गोविंदा आला रे आला!” या घोषणांनी दणाणून गेला. #DhadakKamgarUnion #BJP #BJPKamgarAghadi #DahiHandi2026 #DahiHandiFestival #Govinda #BangurNagar #GoregaonWest #Mumbai #VikramRajput #GovindaAlaRe











Comments