top of page

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची कठोर भूमिका!

  • dhadakkamgarunion0
  • Nov 10
  • 1 min read

[ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची कठोर भूमिका!

● पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट आणि कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात कोणतीही आर्थिक अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास दोषी व्यक्तींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. या प्रकरणातील प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या काही अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात पुणे तहसीलदार आणि दुय्यम उपनिबंधक यांचा समावेश आहे. यावरून मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातील गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा दिला आहे. जनतेच्या हितासाठी पारदर्शक आणि जबाबदार शासन देण्याचा सरकारचा संकल्प आहे. या जमीन गैरव्यवहाराची समांतर चौकशी अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील तपास समितीमार्फत सुरू आहे. एका महिन्यात याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर अंतिम आणि कठोर निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page