top of page

निवडणूक निकालातून विकासाचे राजकारण आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

  • dhadakkamgarunion0
  • 4 hours ago
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

निवडणूक निकालातून विकासाचे राजकारण आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

● ‘राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, ग्रामीण जनतेने महायुतीच्या विकासकामांवर पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटवली आहे. भाजपाने २०१७ चा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला असून, १२ पैकी १२ जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता आली आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला आहे. फडणवीस म्हणाले की, हा विजय केवळ राजकीय विजय नसून तो सामान्यांच्या विश्वासाचा विजय आहे. ग्रामीण भागातील रस्ते, सिंचन आणि शेतीविषयक योजनांमुळे जनतेने पुन्हा एकदा भाजपा आणि मित्रपक्षांना पसंती दर्शवली आहे. विजयाचा आनंद व्यक्त करताना फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. "विरोधकांनी आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे," असे ते म्हणाले. निवडणुकांच्या काळात विरोधकांनी केलेले आरोप जनतेने फेटाळून लावले आहेत, हे निकालांवरून सिद्ध होते. फडणवीस पुढे म्हणाले की, "विरोधक केवळ माध्यमांत आणि समाज माध्यमांवर सक्रीय दिसतात. प्रत्यक्षात मात्र जमिनीवर जनतेत ते कुठेच नाहीत." जनतेच्या प्रश्नांशी त्यांची नाळ तुटलेली असल्याने त्यांना या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page