"‘दै. मुंबई मित्र’च्या मोहिमेला पोलीसांचा प्रतिसाद — ठाण्यातील जुगार-मटक्यावर कठोर कारवाईचे आश्वासन"
- dhadakkamgarunion0
- Aug 12
- 1 min read
‘दै. मुंबई मित्र’ ने मुंबई-ठाण्यात खुलेआमपणे सुरू असलेल्या जुगार-मटक्याबाबत ‘ऑपरेशन जुगार-मटका’ही मोहीम उघडली. या मोहिमेवर ठाण्यातील एका जुगार-मटक्याच्या अड्ड्यावर ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून झालेल्या कारवाईबाबत पोलिसांकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. या जुगार-मटक्याच्या अड्ड्यांवर कनिष्ठ पोलिसांकडून कारवाई न होता उलट ‘हप्त्या’चे रेट वाढल्याचे कळते. याबाबतची माहिती देण्यासाठी ‘दै. मुंबई मित्र’चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी ठाणे शहर गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांची भेट घेतली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत जुगार-मटक्यांच्या अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे ठोस आश्वासन अभिजीत राणे यांना दिले. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांच्याशी चर्चा केली व त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


















Comments