🎬 दादासाहेब फाळके चित्रनगरीत कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती
- dhadakkamgarunion0
- Oct 31
- 1 min read
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि संस्कृती विकास महामंडळ अंतर्गत गोरेगाव दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे चित्रपट सृष्टीशी संबंधित असंघटित कामगार व कलाकार यांच्या विविध मागण्या व तक्रारी यासंदर्भात चित्रनगरी चे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या दालनात सर्व कामगार युनियन सोबत पूर्व नियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी धडक ऑल फिल्म कामगार संघटनेचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून कामगारांच्या मागण्या मांडल्या यावेळी, राष्ट्रीय चित्रपट कामगार संघटना, सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन, सिने सृष्टी असोसिएशन, फिल्म स्टुडिओज सेटींग अलाईड मजदूर युनियन, वेस्टर्न इंडिया फिल्म अँड टीव्ही प्रोड्यूसर असोसिएशन, असोसिएशन ऑफ ऍडव्हरटायसिंग प्रोड्यूसर, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पीकचर्स प्रोड्यूसर असोसिएशन, दादासाहेब फाळके चित्रपट युनियन, इंडियन फिल्म अँड टेलिव्हीजण प्रोड्यूसर्स कॉनसील, प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया आदी युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
#abhijeetrane #photo #dhadakallfilmkamgarsanghtna #dku #दादासाहेबफाळकेचित्रनगरी #goregaon #meeting #labour

















Comments