जागतिक व्यापारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची मोठी झेप
- dhadakkamgarunion0
- 2 hours ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
जागतिक व्यापारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची मोठी झेप
● नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'फेडेक्स'च्या अत्याधुनिक कार्गो हबचे भूमिपूजन झाले. हा प्रकल्प केवळ एक वास्तू नसून भारताला जागतिक पुरवठा साखळीचा केंद्रबिंदू बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जागतिक व्यापाराची बदलती समीकरणे पाहता, महाराष्ट्राने लॉजिस्टिक्स क्षेत्रात घेतलेली ही गरुड झेप राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारी ठरेल. भूमिपूजन प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जगभरातील व्यावसायिक कंपन्या आता चीनला पर्याय शोधत आहेत. अशा परिस्थितीत फेडेक्ससारख्या जागतिक महाकाय कंपनीने महाराष्ट्राची निवड करणे, हा राज्याच्या औद्योगिक सामर्थ्याचा मोठा पुरावा आहे. या हबमुळे भारत थेट दक्षिण-पूर्व आशिया, युरोप आणि अमेरिकेशी जोडला जाईल. हे केंद्र मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक विकासासाठी 'गेम चेंजर' ठरेल. जागतिक पुरवठा साखळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राचे वर्चस्व राहणार आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments