घातपाताच्या रोहित पवारांच्या संशयावर मुख्यमंत्री फडणवीसांचे संयमी उत्तर
- dhadakkamgarunion0
- 4 hours ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
घातपाताच्या रोहित पवारांच्या संशयावर मुख्यमंत्री फडणवीसांचे संयमी उत्तर
● अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांना घातपाताचा संशय आहे. रोहित पवारांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीस म्हणाले की, कोणत्याही मोठ्या अपघाताची चौकशी पूर्ण होण्यापूर्वी असे तर्क-वितर्क लावणे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करते. आपल्या देशातील तपास यंत्रणा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत आणि त्यांच्यावर अविश्वास दाखवणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, अपघाताच्या ठिकाणाहून ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला असून त्यातील माहितीचा सखोल अभ्यास केला जात आहे. चौकशी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. भारताच्या तपास यंत्रणा केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही चौकशीसाठी बोलावल्या जातात, त्यामुळे त्यांच्या क्षमतेवर शंका घेऊ नये. रोहित पवारांच्या विधानावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, अजितदादा हे राज्याचे मोठे नेते होते आणि त्यांच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झाले आहे. रोहित पवार कदाचित भावनेच्या भरात असे बोलले असावेत. मात्र, सत्य लवकरच बाहेर येईल आणि तोपर्यंत संयम पाळणे आवश्यक आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments