ग्रामीण महाराष्ट्रासाठी ‘विकास पर्व’; मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक निर्णय
- dhadakkamgarunion0
- Aug 22
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
ग्रामीण महाराष्ट्रासाठी ‘विकास पर्व’; मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक निर्णय
● राज्याच्या ग्रामीण भागाचे चित्र बदलून टाकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत अनेक मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी योजनांना अंतिम स्वरूप देण्यात आले. या बैठकीत ग्रामीण महाराष्ट्रातील घरांचे प्रश्न, महिला सबलीकरण आणि जलव्यवस्थापनासारख्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला एक नवी दिशा मिळणार असून, लाखो कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्यात ‘बेघरमुक्त महाराष्ट्र’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारने ‘महाआवास अभियान’ अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. वीज, पाणी, रस्ता, शौचालय आणि रोजगार यांसारख्या मूलभूत सुविधाही पुरवल्या जातील, जेणेकरून घराचे स्वरूप ‘समृद्ध’ आणि ‘राहण्यायोग्य’ होईल.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments