खामेनेईच्या मृत्यूनंतर इराण शांत होईल अशी अपेक्षा करणाऱ्यांनी वास्तवाचा विचार करावा.
- dhadakkamgarunion0
- Mar 3
- 2 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
खामेनेईच्या मृत्यूनंतर इराण शांत होईल अशी अपेक्षा करणाऱ्यांनी वास्तवाचा विचार करावा. इराणची धार्मिक, राजकीय आणि लष्करी नेतृत्व नवीन स्वरूपात उभे राहिले आहे आणि आता वाटाघाटींचा स्कोप संपला आहे. संकटाच्या काळात जनसंख्या बाह्य शक्तींविरुद्ध एकत्र येते, त्यामुळे राजवट उलथणे कठीण आहे. इराणकडे प्रचंड ड्रोन आणि मिसाईल्स आहेत, त्यामुळे दुबई, अबू धाबी, दोहा, ओमान, इराक यांसारख्या शेजारी देशांवर हल्ले सुरूच राहतील. हे फक्त जीवितहानी नाही तर मनोवैज्ञानिक युद्ध आहे, ज्याचा परिणाम अर्थव्यवस्था, पर्यटन आणि जनमानसावर होईल. इराण स्ट्रेट ऑफ हॉरमुज आणि बाब-एल-मांडेब रोखण्याचा प्रयत्न करेल, जिथून जगातील 40% तेल-गॅस वाहतूक होते. काही आठवडेही युद्ध चालले तर जागतिक महागाई उसळेल. अमेरिका-इस्राएलने इराणला इराक किंवा व्हेनेझुएला समजणे ही मोठी चूक ठरेल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
हौतात्म्य हा अपघात नसून हळूहळू निवडलेला मार्ग आहे. प्रत्येक नकार, प्रत्येक सार्वजनिक उपस्थिती हे त्याचे पाऊल असते. महासत्तांना तलवारींची नाही तर प्रश्नांची भीती वाटते, म्हणूनच असहमतीतून हौतात्म्याचे बीज उगवते. अयातुल्ला खोमेनीच्या मृत्यूने हेच दाखवले. पर्शियन ते इस्लामिक राष्ट्र बनवताना त्यांनी धर्माच्या नावाखाली भीतीला चेहरा दिला आणि हजारो विरोधकांना फाशी दिली. 1988 मध्ये तर न्यायालयाशिवाय हजारो कैद्यांना ठार करण्यात आले. महिलांचे हक्क संपले, पत्रकार गायब झाले, विद्यार्थ्यांना मृत्यूदंड मिळाला. त्यामुळेच आज इराणमध्ये खोमेनीच्या मृत्यूवर दुःख आणि आनंद दोन्ही दिसतात—तरुण आणि महिला आनंदात, कट्टरतावादी दुःखी. भविष्यात इराण कट्टरतावादातून पर्शियन ओळखीकडे सरकला तरच वाचेल, अन्यथा हौतात्म्याच्या नावाखाली समाज मातीमोल होईल.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात
दिल्ली कोर्टाने अरविंद केजरीवाल, मनीष शिसोदिया यांच्यासह २३ जणांना लिकर स्कॅममधून निर्दोष मुक्त केले. गठ्ठ्याच्या गठ्ठे चार्जशीट असूनही सीबीआय पुरावे आणि साक्षीदार सादर करण्यात अपयशी ठरली. या प्रकरणात केजरीवाल १५६ दिवस आणि शिसोदिया तब्बल ५३० दिवस तुरुंगात राहिले. न्यायालयाने सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिले असून संस्थेवर कठोर शब्दांत टीका केली आहे. या निर्णयाने केवळ आरोपींची सुटका झाली नाही तर सीबीआयच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राजकीय नेत्यांना दीर्घकाळ जेलमध्ये ठेवून शेवटी पुरावे न सादर करणे ही न्यायव्यवस्थेची थट्टा आहे. या प्रकरणातून स्पष्ट होते की तपास यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप निराधार नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
प्रशांत किशोर यांनी योग्यच म्हटले होते की भाजप मतदारांना फक्त मतांसाठी नाही तर त्यांच्या जीवनशैलीवरही प्रभाव टाकतो. पण ही विचारधारा स्वतःच्या नेत्यांच्या गळ्यात उतरली नाही. कट्टर हिंदुत्वाची भाषा करणारे नेते निवडणुकीत मुस्लिम मोहल्ल्यात पाय पडताना दिसतात. बदलापूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या मुलीने प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि त्यानंतर आईचा राजीनामा घेतला गेला, पण वडील अजून पदावर आहेत. हे दाखवते की अनेक नेते फक्त सत्तेसाठी भाजपसोबत आहेत, विचारधारेसाठी नाहीत. हिंदुत्व सोशल मीडियावर आहे, पण जमिनीवर नाही. गरीबांना मोफत योजना देताना भाजपने मध्यमवर्गीय मतदारांचा विसर पडला आहे. शेवटी, ढोंगी नेत्यांच्या घरातच भाजपची तत्वे शिरली नाहीत, हेच या प्रकरणाने स्पष्ट केले आहे
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
दुबईत फिरायला गेलेले आणि भारताला घाण म्हणून दुबईची स्तुती करणारे भारतीय परत आणण्यासाठी सरकारने यावेळी फुकटची सोय करू नये. तसेच ईरानमध्ये डॉक्टर होण्यासाठी गेलेले तरुण-तरुणींना तिथेच राहून स्थानिक नागरिकांची सेवा करण्याची संधी द्यायला हवी. दरवेळी भारत सरकार मोफत परत आणते म्हणूनच आपल्या लोकांना युद्धाची भीती वाटत नाही. त्यांना खात्री असते की संकट आले तरी सरकार त्यांना सुरक्षित परत आणेल. पण एखादेवेळी पाच-दहा लाखांचा खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागला तर पुन्हा परदेशात जाण्यापूर्वी दोनदा विचार करतील. सरकारने कठोर भूमिका घेतली तरच नागरिकांना जबाबदारीची जाणीव होईल आणि परदेशात जाण्याचे निर्णय अधिक शहाणपणाने घेतले जातील.
🔽








Comments