"आरे वाचवा: किरीट सोमय्या व अभिजीत राणे यांची पर्यावरण संरक्षणासाठी संयुक्त मोहीम"
- dhadakkamgarunion0
- Aug 10
- 1 min read
मुंबईचे “फुफ्फुस” म्हणून ओळखले जाणारे आरे कॉलनी हे फक्त हिरवेगार जंगल नाही, तर असंख्य वन्यजीवांचे घर, स्वच्छ हवेसाठीचे नैसर्गिक साधन व पाण्याचे महत्त्वाचे स्रोत आहे. पण गेल्या काही काळात बेकायदेशीर भरणी, अवैध बांधकामे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरेचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
या गंभीर परिस्थितीवर लक्ष केंद्रित करत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ‘आरे वाचवा’ मोहीम हाती घेतली आहे. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबवण्यासाठी आणि बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यासाठी ते सतत दौरे करत आहेत.
अशाच एका दौऱ्यात त्यांनी अधिकाऱ्यांसह गोडाऊन क्र. 6, 7, 8, 9 आणि 14 येथे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आरे प्रशासनाचे अधिकारी, स्थानिक भाजपा पदाधिकारी तसेच भाजपा मुंबई उपाध्यक्ष व कामगार नेते अभिजीत राणे, उपस्थित होते. पाहणीदरम्यान आरेतील बेकायदेशीर भरणी आणि पर्यावरणीय नुकसानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आरेचे जंगल वाचवणे ही केवळ पर्यावरणाची नव्हे तर मुंबईच्या भविष्यातील पिढ्यांची जबाबदारी आहे. हरित वारसा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या मोहिमेला हातभार लावावा असे यावेळी त्यांनी आवाहन केले.
#SaveAarey #AareyVachva #GreenMumbai #EnvironmentProtection #BJP #AbhijeetRane #KiritSomaiya #HaritWarasa #Mumbai














Comments