top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • May 6
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एआयच्या मदतीने बनवलेला एक फोटो पोस्ट केल्यामुळे काही कॅथलिक धर्मियांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. या फोटोमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पोप यांच्या वेशभूषेत दिसत आहेत.पोप फ्रान्सिस यांचं 21 एप्रिल रोजी निधन झालं. कॅथलिक धर्मीय लोक पोप यांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करत आहेत आणि पुढचे पोप निवडण्याची तयारी सुरू असतानाच व्हाईट हाऊसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. परंतु या पोस्टचा खरा अर्थ वेगळा आहे. ख्रिश्चन धर्माच्या परंपरेत धर्मसत्ता आणि राजसत्ता ही पॉपच्या हातात होती. 1929 साली वॅटिकन सिटी हा छोटा देश करून तो पॉप यांच्यासाठी वेगळा प्रदान केला गेला. त्यानंतर राजसत्ता आणि धर्मसत्ता विलग झाल्या. ट्रंप आपला फोटो या पद्धतीने काढून देत स्वतःला आधुनिक ख्रिश्चन जगताचा राजसत्ताधीश असण्याच्या जोडीला धर्मसत्ताधीश दाखवण्याचा सुद्धा प्रयास करत आहेत. समस्त ख्रिस्ती जगत माझ्या पाठीशी उभे राहावे यासाठी ट्रंप यांनी ही प्रतिकांची खेळी केली आहे. टीका झाली तरी या मुद्द्यावर चर्चा घडणार आहेच आणि ट्रंप यांना नेमके तेच तर हवे आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

गेले पालकमंत्री कुणीकडे ? असे पुणेकर संतप्त होऊन विचारत आहेत. नागपूर दंगलीच्या नंतर दोनच दिवसांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी त्यांच्या पक्षातर्फे इफ्तार पार्टी आयोजित केली होती. वास्तवात पोलिसांवर झालेले हल्ले लक्षात घेता त्यांनी ती टाळणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे केले नाही उलट त्या पार्टीमध्ये त्यांनी मुस्लिमांना मी तुमचा भाऊ आहे तुमच्याकडे कोणी डोळे वटारून बघणार नाही अशी ग्वाही दिली होती. चार दिवसांच्या पूर्वी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाचे पुण्यात उद्घाटन करताना त्यांना इतकी घाई झाली होती की भाजपा खासदार मेघा कुलकर्णी उगवण्यापूर्वी ते उद्घाटन करून मोकळे झाले. मग त्यांची नाराजी दूर करण्यासाठी परत उद्घाटनचे सोपस्कार पार पाडले. दोन दिवसांच्या पूर्वी पौड येथे मंदिरात एका मुस्लिमाने देवीच्या मूर्तिची विटंबना केली. त्याचा सर्वांनी निषेध केला. अगदी सुप्रिया ताई सुळे यांनी सुद्धा तीव्र शब्दात निषेध नोंदवला परंतु पुण्याचे पालकमंत्री असणार्‍या अजित दादांना मात्र अजून प्रतिक्रिया द्यायला वेळ मिळालेला दिसत नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मिडिया आणि विरोधक यांनी समजून घेतले पाहिजे असे हे सत्य आहे. राजीव गांधींनी कोणत्याही ठोस कारणाशिवाय आणि कोणत्याही ठोस योजनेशिवाय भारतीय सैन्य श्रीलंकेत पाठवले. जाफना भागात लष्कराला एलटीटीईशी लढावे लागले, जो केवळ दलदलीचा प्रदेश नव्हता तर तेथील स्थानिक तमिळ लोकही भारताविरुद्ध होते.३ वर्षांच्या लढाईनंतरही भारतीय सैन्याला सैनिकांच्या बलिदानाशिवाय काहीही हाती लागले नाही.स्वतःला शहाणे समजणारे टीका करत आहेत की भारतीय सैन्याने आतापर्यंत पाकिस्तानवर हल्ला का केला नाही? एक तथाकथित शंकराचार्य देखील ज्ञान देत आहे.इतक्या मोठ्या दहशतवादी घटनेनंतरही, इस्रायलला पॅलेस्टिनी गाझा पट्टीवर हल्ला करण्यासाठी एक महिना लागला, जिथे कोणतेही सैन्य नव्हते.गाझा पट्टीतील युद्ध अजूनही सुरू आहे.९/११ च्या घटनेनंतर अमेरिकेला अफगाणिस्तानवर हल्ला करण्यासाठी २ महिने लागले. पाकिस्तानला विकत घ्यावे लागले.मोदींनी तिन्ही सैन्यांना वेळ आणि लक्ष्य ठरवण्याचे पूर्ण अधिकार दिले आहेत. कारवाई निश्चित होईल पण त्यात आपली कमीतकमी हानी व्हावी या दृष्टीने आखली जात आहे आणि म्हणून वेळ लागतो आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

स्थापनेपासून कार्यक्षम प्रशासन आणि विकासाभिमुख नेते असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य. जोडीला मुंबईसारखी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आपल्याकडे याचा परिणाम आपले कर संकलन कायमच पहिल्या क्रमांकाचे राहिले आहे. अगदी सहज हिशेब केला तर असं दिसतं की थेट करांच्या स्वरूपात महाराष्ट्रातून जेंव्हा १०० रूपये दिल्लीला जातात तेंव्हा महाराष्ट्राला विकास कामांसाठी परत मिळतात साधारण ७ रूपये आणि ७० पैसे ! हा हिशेब जरासा इकडे-तिकडे होईल पण फार नाही फरक पडणार.बिहारला मात्र मिळतात ९२२ रूपये आणि ५० पैसे, गुजरातला ३१ रूपये ३० पैसे, उत्तर प्रदेशला ३३३ रूपये आणि २० पैसे ! एक गोष्ट खरी की महाराष्ट्र पहिल्यापासून पुढारलेला आहे आणि महाराष्ट्र जे योगदान देईल त्यातून दिल्ली सरकारनं जरूर मागासलेल्या राज्यांना पुढे यायला मदत केली पाहिजे. फक्त प्रश्न एव्हढाच पडतो की तो किती करावा आणि कुठपर्यंत? महाराष्ट्रालाही विकास कामांसाठी निधी कमी पडतो आहे, वित्त आयोगानं ह्यावर विचार करायला हवा. कर संकलन आणि केंद्राकडून दिला जाणारा निधी यातील तफावत दूर करणे आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

कोंग्रेस पक्षाच्या पापांची यादी संपता संपत नाही. जेव्हापासून भारताने पाकवासीयांना भारतातून परत तिकडेच पाठवायचा निर्णय घेतलाय तो पाहता बरीच झुरळं बाहेर पडताना दिसत आहेत. मोरादाबादमध्ये २२ अश्या पाकिस्तानी बायका सापडल्या आहेत ज्या लॉंग टर्म विजावर भारतात गेली अनेक वर्षे राहत असून त्यांनी एकूण ९५ पिल्लांना जन्म दिलाय. ह्या बायकांना जरी भारताचं नागरिकत्व मिळालं नसलं तरी त्यांच्या पिल्लांना मिळालं आहे.. जन्माने..ह्या बावीसपैकी दोघी चार वर्षांपासून आहेत तर इतर दशकापेक्षा जास्त काळ इथं आहेत.ह्या बावीसपैकी ८ बायका आजी झाल्या असून ह्या सर्व बायकांच्या एकत्रीत कुटुंबाचा आकार केवळ ५०० जणांचा आहे. फक्त पाचशे.. भारतीय हिंदू नागरिक जिथे "हम दो हमारे एक" किंवा "हम दो, बाकीका छोड दो" अश्या मानसिकतेत आहेत आणि ही बाहेरची लोकं मजबूत पिल्लं जन्माला घालत आहेत. ह्या बायकांकडे आधार आहे, रेशन कार्ड आहे, मतदान केलं आहे, काय काय नि काय काय..अशी बरीच प्रकरणं उघडकीस येत असून ही आपलीसुद्धा जबाबदारी आहे की जर आपल्या आजूबाजूला ही असली पिलावळ दिसली तर जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये ह्याची माहिती दिली पाहिजे..

🔽


ree

ree

ree

ree

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page