🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- 11 hours ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
झायेद- मोदी भेट आणि खाडीतील समीकरणे
यूएई अध्यक्ष झायेद यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट ही केवळ औपचारिकता नाही, तर खाडीतील बदलत्या राजकीय समीकरणांचा भाग आहे. सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांनी एकत्र येऊन यूएईमध्ये तख्ता पलटाचा प्रयत्न सुरू केल्याच्या चर्चेत ही भेट अधिक महत्त्वाची ठरते. झायेद यांचा भारताशी संवाद हा सुरक्षिततेचा आधार शोधण्याचा प्रयत्न मानला जातो. भारत-यूएई संबंध आधीपासूनच व्यापार, ऊर्जा आणि सुरक्षा या क्षेत्रांत मजबूत आहेत. अशा वेळी सौदी-पाक-तुर्क गटाच्या हालचालींना तोल देण्यासाठी भारताची भूमिका निर्णायक ठरू शकते. मोदी-झायेद भेटीत गुंतवणूक, संरक्षण सहकार्य आणि प्रादेशिक स्थैर्य यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. खाडीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही भेट भारतासाठी धोरणात्मक संधी ठरू शकते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
स्थानिक सत्ता आणि राजकीय वास्तव
महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेले नगरसेवक हे केवळ वॉर्डांचे प्रतिनिधी नसतात, तर संपूर्ण स्थानिक इकोसिस्टिमचे केंद्रबिंदू बनतात. पोलीस स्टेशनवरील कारवाई, सरकारी कार्यालयातील फाइलांची गती, गुंडांना संरक्षण, योजनांचा लाभ, निधीचा वापर, ठेकेदारांची निवड, अधिकारी बदली-नेमणुका, माध्यमांवरील पकड – या सर्व गोष्टींवर लोकप्रतिनिधींचा थेट प्रभाव असतो. त्यामुळे त्यांच्या विजयाचा अर्थ फक्त मतांच्या आकड्यांपुरता मर्यादित राहत नाही, तर स्थानिक समाजातील सत्ता-संतुलन ठरवतो. या वेळी 21 मुस्लिम नगरसेवक उद्धव ठाकरे गटातून विजयी झाले आहेत. MIM किंवा इस्लाम पक्षापेक्षा हा आकडा अधिक गंभीर मानला जातो, कारण तो आतून किल्ला उघडण्याचा धोका निर्माण करतो. महानगरपालिका निकालांचे समीकरणे वेगवेगळी असली तरी एक सत्य स्पष्ट आहे – स्थानिक सत्ता हीच समाजातील मानसिक वातावरण आणि भविष्यातील राजकारण घडवते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
बीएमसी विजयाचा शिल्पकार – अमित साटम
मुंबईच्या राजकारणात 2026 च्या बीएमसी निवडणुकीने ऐतिहासिक वळण दिले. महायुतीच्या विजयामागे शहर भाजप प्रमुख अमित साटम यांचे धोरणात्मक नेतृत्व ठळकपणे दिसून आले. संघटनात्मक समन्वय, उमेदवार निवड, तीव्र प्रचार मोहीम आणि विकासकेंद्रित नरेटिव्ह यामुळे महायुतीने 227 पैकी 118 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. वैयक्तिक टीकेकडे दुर्लक्ष करून त्यांनी ग्राउंडवर काम केले, 80 हून अधिक सभा व रोडशो घेतले आणि मतदारांशी थेट संपर्क साधला. ‘मुंबईकरांचा मॅनिफेस्टो’ तयार करून जनतेच्या अपेक्षा थेट राजकारणात आणल्या. जागावाटपावरून वाद न होऊ देता शिवसेना-भाजप आघाडी एकसंध ठेवली. शिवसेनेच्या भ्रष्टाचारावर आरोपपत्रिका सादर करून चर्चेचा फोकस विकासाकडे वळवला. भ्रष्टाचारमुक्त मुंबई आणि हिंदुत्वाचा कॉम्बो यावर त्यांनी जनतेला एकत्र केले. या विजयाने मुंबईच्या राजकारणात नवे युग सुरू झाले आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात
विजयाची सलग हॅट-ट्रिक
गेल्या 14 महिन्यांत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व कामगिरी केली आहे. विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा शंभरी पार करून हॅट-ट्रिक साधणारा हा एकमेव पक्ष ठरला. नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये तब्बल 75% ठिकाणी क्लिन-स्वीप करत स्थानिक पातळीवरही आपली पकड मजबूत केली. आता मुंबईसह 25 महानगरपालिकांमध्ये 86.2% च्या स्ट्राईक-रेटने विजय मिळवून पक्षाने इतिहास रचला आहे. या यशामागे हिंदुत्वाचा ठाम आधार आणि विकासकेंद्रित कर्तृत्वाची सांगड आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने संघटनात्मक ताकद, धोरणात्मक नियोजन आणि जनतेशी थेट संवाद साधून विजयाची नवी परिभाषा दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा टप्पा केवळ निवडणुकीचा निकाल नाही, तर भविष्यातील स्थिरता आणि प्रगतीचा पाया आहे. देवाभाऊ आणि भाजपचे मनःपूर्वक अभिनंदन!
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
वसई-विरारचा निकाल आणि ठाकूरांचा कमबॅक
वसई-विरार महानगरपालिकेचा निकाल हा राज्यातील सर्वात कमी धक्कादायक ठरला. भाजपसाठी ही लढत कठीण होती आणि शेवटी पराभव झाला. मात्र ठाकूरांनी विधानसभा पराभवानंतर खचून न जाता जनसंपर्क वाढवला, नम्रतेचा सूर स्वीकारला आणि थेट जनतेत मिसळले. काँग्रेस-मनसेसोबत आघाडी करून त्यांनी रणनीतीपूर्वक गणित मांडले. द्वारकाधीश मंदिरासह धार्मिक उपक्रम जनतेसमोर सातत्याने मांडले आणि सौम्य हिंदुत्वाची सकारात्मक मांडणी केली. भाजपचा प्रचार नकारात्मक राहिला, तर ठाकूरांनी विकासाच्या मुद्द्यावर थेट प्रश्न उपस्थित केले. नॅनो पातळीवरील नियोजन, प्रत्येक प्रभागातील उपस्थिती आणि समन्वयाची भूमिका यामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला. ‘ठाकूर म्हणजे ठाकरे नाहीत’ हा संदेश प्रभावी ठरला. त्यामुळे वसई-विरारमध्ये ठाकूरांनी पुन्हा जोरदार कमबॅक साधला आणि स्थानिक राजकारणात आपली पकड मजबूत केली.
🔽












Comments