🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Sep 24
- 2 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारत विरोधी मीडियाचा हिडीस चेहरा. ‘पाकिस्तानने भारतीय वायुदलाची सहा विमाने पाडली’ ही फेक न्यूज सर्वप्रथम कॉम्रेड एन. राम यांच्या द. हिंदूने उचलली. लगेच द. वायर या कम्युनिस्ट पोर्टलने ती पुढे नेली. दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांनी ती बातमी गाजवली आणि काँग्रेस आयटी सेलने ती देशोदेशी पसरवली. पाकिस्तानला हा बहाणा मिळाला आणि त्यांनी भारतीय माध्यमं, पोर्टल्स व विरोधी पक्षांची वक्तव्यं दाखवून 6-0 चा अजेंडा रंगवला. इतक्यावर न थांबता आशिया कपमध्ये मुनीरच्या मुलांनीही तोच अजेंडा पुढे नेला, ज्याला द. हिंदू, द. वायर आणि काँग्रेस आयटी सेलने पुन्हा चालना दिली. गोबेल्स जिंदाबाद! लाल सलाम!!
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
धाराशिव पुरपरिस्थिती : राज्य सरकारचे अथक मदतकार्य ! धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण पुरपरिस्थितीत भारतीय नौसेनेच्या दक्षिण कमांडचे वायुसेना जवान रेस्क्यू ऑपरेशनमध्ये गुंतले आहेत. शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून बचावकार्य अजूनही सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले असून आवश्यकतेनुसार अतिरीक्त हेलिकॉप्टर मागवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. संकटाच्या या काळात संपूर्ण यंत्रणा जीव तोडून काम करत असताना फेसबुकसारख्या माध्यमांवर काही जण मात्र राजकारण करण्यात मश्गुल आहेत. मात्र नागरिकांचे प्राण वाचवणे हीच खरी प्राथमिकता असल्याचे राज्य सरकार स्पष्टपणे दाखवून देत आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सूर्योदयाच्या दिशेने: अष्टलक्ष्मी आणि राष्ट्रचेतना!! पंतप्रधान मोदींच्या संबोधनात नवीन काही नसले तरी "सूर्योदय" आणि "शैलपुत्री" हे शब्द विशेष ठरले. अरुणाचल प्रदेशात सूर्योदयाच्या क्षणी मोदींनी पूर्वोत्तर राज्यांना "अष्टलक्ष्मी" असे संबोधून नवचैतन्य दिले. २०१४ पासून "लुक ईस्ट" धोरणातून रेल्वे, रस्ते, वीज, पाणी, क्रीडा, शौचालय अशा मूलभूत सुविधांचा विस्तार झाला. म्यानमार, लाओस, थायलंड, इंडोनेशिया, कोरिया यांच्याशी सांस्कृतिक नाळ पुन्हा जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. अंगकोरवाट मंदिर, रामायणप्रेमी इंडोनेशिया, अयोध्येशी जोडलेले कोरिया—हे सारे इतिहास मोदीजी पुन्हा उजळवत आहेत. सुभाषचंद्र बोस यांचे स्वप्न, ग्रेट निकोबार प्रकल्प, आंतरदेशीय महामार्ग, जलवाहतूक—हे सर्व राष्ट्रवादाचे नवे प्रतल निर्माण करत आहेत. "शैलपुत्री" म्हणजे हिमालयाची कन्या, आणि "ब्रह्मदेश" म्हणजे ब्राम्ह्य मुहूर्त—या प्रतीकांतून भारताचा पूर्वेकडील आत्मा जागवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
ब्रिटनला हादरा: पॅलेस्टाइनची £2 ट्रिलियनची मागणी!! ब्रिटनने पॅलेस्टाइनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिल्यानंतर लगेचच पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी ब्रिटनकडून £2 ट्रिलियन इतकी भरपाई मागितली. 1917 ते 1948 दरम्यान ब्रिटिश राजवटीत झालेल्या अन्यायासाठी ही मागणी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे करण्यात आली आहे. या मागणीने ब्रिटनमध्ये खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पॅलेस्टाइनच्या राष्ट्रमान्यतेनंतर लगेचच असा आर्थिक दावा केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या मागणीमागे इतिहासाची जखम आणि न्यायाची अपेक्षा आहे, पण त्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्रिटनसाठी ही घटना केवळ राजकीय नव्हे, तर नैतिक आव्हानही ठरू शकते. पॅलेस्टाइनच्या या पवित्र्यामुळे जागतिक चर्चेला नवे वळण मिळाले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
बिहारच्या राजकारणात 'पीके'चा स्फोटक प्रवेश! प्रशांत किशोर यांनी बिहारच्या राजकीय पटावर जबरदस्त हलकल्लोळ निर्माण केला आहे. जनता दल (यू) मधील अशोक चौधरी यांचा जमीन घोटाळा, बँक व्यवहारांसह तारीखवार उघड केला गेला. दुसरीकडे भाजपचे सम्राट चौधरी यांच्यावर मंत्रीपदाच्या काळातील खून, शिक्षा, अल्पवयीनतेचा दावा, आणि शैक्षणिक पात्रतेबाबत गंभीर आरोप झाले आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदवी व डॉक्टरेट मिळवण्याच्या दाव्याला दहावी-बारावी सर्टिफिकेट नसल्याचा विरोधाभास दाखवण्यात आला. या सगळ्या माहितीचा स्रोत कोण? पडद्यामागे गिरीराज सिंह, राजीव प्रताप रुडी की आणखी कोणी? बिहारच्या राजकारणात स्पर्धेतील प्रमुख घोडे उडवले गेले आहेत. 'पीके'ने केलेल्या या स्फोटक खुलाशांमुळे निवडणूकपूर्व वातावरण तापले असून, राजकीय समीकरणे नव्याने जुळवली जात आहेत. बिहारचा खेळ आता अधिकच रंगतदार होतो आहे.
🔽
#IndiaMedia #FakeNews #FloodRelief #Orchha #NorthEast #Sunrise #PalestineUK #Geopolitics #PKinBihar #PoliticalTwist





Comments