top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Sep 22
  • 3 min read

ree

ree

ree

ree

ree

🖋️ अभिजीत राणे लिहितात

युसुफ पठाणचा अतिक्रमणावरून फसलेला डाव! प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचा खासदार युसुफ पठाण याने केलेले अतिक्रमण शेवटी उघड झाले आहे. क्रिकेटमधील नाव, लोकप्रतिनिधीची ओळख आणि पैशाची ताकद वापरून जमिनीवर कब्जा वैध ठरेल असा त्याचा समज होता. अगदी “मी मार्केट प्राईस देतो, पण माझ्या बंगल्यालगतची जमीन मला अलॉट करा” अशी मागणी त्याने केली. मात्र, कायदा कुणाच्याही पदाला वा प्रसिद्धीला झुकत नाही, हे महापालिकेने ठामपणे दाखवून दिले. कोर्टाने स्पष्ट केले की पैसे देऊन बेकायदेशीर कब्जा वैध होत नाही आणि अतिक्रमणकर्त्यास कुठलीही सूट मिळणार नाही. लोकप्रतिनिधी असूनही असा प्रकार करणे हीच जनतेच्या विश्वासाला तडा देणारी बाब आहे. क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकार मारणाऱ्या पठाणचा हा डाव मात्र फसला आहे. कायद्याच्या खेळपट्टीवर कुणालाही फ्री हिट मिळत नाही हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

उसाच्या मळीतील किंकाळ्या! महाराष्ट्रातील साखर सहकार हा शेतकऱ्यांचा उद्धारक न ठरता अनेकदा त्यांचा छळकर्ता ठरला आहे. कारखान्यांच्या बॉयलरमध्ये कित्येक विरोधकांना संपवून टाकल्याच्या कथा आजही जनमानसाला थरकाप उडवतात. “हुं नाय की चुं नाय...” म्हणत सत्तेच्या दांडग्यांनी अनेकांचे आवाज कायमचे गप्प केले. आजही ऊसाच्या मळीला कान लावला तर किंकाळ्या ऐकू येतात, नाक लावले तर जळलेल्या मांसाचा दुर्गंध जाणवतो, अशी भीषण आठवण लोकांच्या मनातून पुसली गेलेली नाही. या रक्तरंजित सहकारातून उभे राहिलेले नेते लोकशाहीच्या नावाने सत्ता उपभोगत राहिले. मात्र, गोपीचंद पडळकर यांचा आवाज या सगळ्या पिढ्यांचा आवाज बनून घुमत आहे. शेतकऱ्यांचा, शोषितांचा, गप्प बसवलेल्या जनतेचा आक्रोश त्यांच्या भाषणातून बाहेर पडतो. ऊसासारख्या गोड पिकाच्या मागे दडलेला हा कडू इतिहास पुढच्या पिढ्यांनी विसरता कामा नये.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राहुल गांधींचा जेवणाचा ढोंगी शो! काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा हा फोटो पाहिला की ढोंगीपणाचे उत्तम उदाहरण दिसते. वरकरणी साध्या घरात जमिनीवर बसून जेवत असल्याचे चित्र दाखवले जाते, पण त्यामागील नाटकीपणा लगेच उघड होतो. घरात सिलेंडर असूनसुद्धा शेजारीच चूल उभी केलेली दिसते आणि तीही ताजी ताजी, कारण खऱ्या ग्रामीण घरात फरशीवर कधीच चूल बसवली जात नाही—उष्णतेने फरशी तडकण्याचा धोका असतो. आणखी एक विचित्र बाब म्हणजे, सर्वजण बूट घालून थेट जेवणाला बसलेले आहेत. ग्रामीण संस्कृतीत हे अशक्य आहे; घरी जेवण करताना शुद्धतेची काळजी घेतली जाते, बूट घालून कोणीही पंगतीत बसत नाही. जनतेच्या सहानुभूतीसाठी असा नाट्यमय प्रसंग उभा केला गेला हे स्पष्ट आहे. सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडले जाण्याऐवजी केवळ कॅमेरासमोर साधेपणाचा मुखवटा लावण्याची ही राजकीय कसरत आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

आयफोनचा हव्यास की दिखावा? भारतीय बाजारात आय फोन 17 दाखल होताच विविध शहरांमध्ये हजारो तरुणांनी रात्रीपासून अॅपल स्टोअर बाहेर रांगा लावल्याच्या बातम्या समोर आल्या. किंमत 82,900 रुपयांपासून तब्बल 2,29,900 रुपयांपर्यंत असल्याचे ऐकून मध्यमवर्गीयांचे डोळे विस्फारले. खरोखरच एवढ्या महागड्या फोनची गरज आहे का? आज 7-8 हजारांत स्मार्टफोन उपलब्ध आहेत. थोडा हौशी असेल तर 12-18 हजारांचा घेतला तरी चालतो. पण 80 हजार ते दोन लाखांच्या वर किंमत देऊन मिळणाऱ्या फोनमध्ये असे नेमके काय खास आहे जे साध्या फोनमध्ये नाही? गंमत म्हणजे इतका महाग फोन घेतल्यावर चार्जरही वेगळा विकत घ्यावा लागतो. दुरुस्तीचा खर्चही प्रचंड. मग या खरेदीमागे गरज आहे की केवळ प्रतिष्ठेचा दिखावा? ज्यांच्याकडे पैसा आहे ते घेतील, पण बाकीच्यांसाठी हा केवळ हौशी आणि धोका वाढवणारा सौदा आहे. खरंच, आय फोन ही स्मार्टनेसची खूण आहे की मूर्खपणाचा फॅशन?

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

नवरात्रीत मोदींची खरी भेट – जी एस टी कपात! नवरात्रीच्या शुभारंभीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. २२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या जी एस टी कपातीमुळे ग्राहकांच्या दैनंदिन खरेदीवर थेट बचत होणार आहे. दूध, पनीर, बटर, चीज, आइसक्रीमवरील कर १२% वरून ५% किंवा शून्य झाला आहे. ब्रेड, रोटी, पराठा, शालेय साहित्य यांवर करमुक्ती मिळाली असून हस्तकला आणि कुटीर उद्योगांवरील दर १८% वरून थेट ५% पर्यंत कमी झाले. त्यामुळे प्रत्येक घरातील सणासुदीच्या खरेदीचा खर्च हलका झाला आहे. अमूल, मदर डेअरी, नंदिनी यांसारख्या कंपन्यांनी दरकपात केली तर मारुती, टाटा, महिंद्रासह वाहन कंपन्यांनीही गाड्यांचे दर कमी केले. कपड्यांपासून घरगुती वस्तूंपर्यंत स्वस्ताई आल्याने बाजारपेठ फुलणार आणि रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. जग महागाईने ग्रासले असताना भारतात करकपातीद्वारे दिलासा देणे ही मोदींच्या दूरदृष्टीची खरी ताकद आहे. या निर्णयामुळे नवरात्रीचा उत्सव खऱ्या अर्थाने आनंदोत्सव ठरला आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page