🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- 19 minutes ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
गोंधळाचा कारभार, प्रश्नचिन्ह वकिलावरच ! मनोजदादा जरांगे यांच्या लढ्याला अपेक्षित न्याय मिळत नसताना, वकिल असीम सरोदे यांनी केलेले विधान स्वतःच प्रश्न निर्माण करणारे आहे. “फोन आले होते, मेसेज पाठवले होते” अशा सबबी सांगत ते हात झटकतात. प्रत्यक्षात जनतेला आणि आंदोलनकर्त्यांना ठोस कायदेशीर दिशा हवी होती, सबबी नाहीत. जर खरंच सरकारी प्रतिनिधींना सांगायचे होते, तर ते वेळेत का केले नाही? आणि संदेश पाठवून थांबायचेच होते का? हे संपूर्ण वक्तव्य लोकांची दिशाभूल करणारे आणि मनोजदादांच्या संघर्षाला कमकुवत करणारे वाटते. लढ्याच्या निर्णायक टप्प्यावर वकील स्वतःच गोंधळ निर्माण करत आहेत, हा मोठा प्रश्न आहे. कायद्याच्या आधाराने आवाज बुलंद व्हायला हवा, पण इथे आवाजाऐवजी सबबी ऐकू येतात. समाजाची निराशा वाढवणारे हे बोलके मौन लाजिरवाणे आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भुजबळांचे नाटकबाज बहिष्कार! मराठा आरक्षणाच्या जीआरवरून छगन भुजबळांचा कॅबिनेट बैठकीवरील बहिष्कार हा सरळसरळ राजकीय नाटकबाजपणा आहे. सत्ता उपभोगताना खुर्ची घट्ट पकडायची, पण प्रश्न आला की बहिष्काराचे ढोंग करायचे—हीच त्यांची नेहमीची पद्धत. आरक्षणाच्या विषयावर खरेच ओबीसी बांधवांच्या हक्कासाठी उभे राहायचे असेल तर थेट संघर्षाला सामोरे जा; फक्त बैठका बहिष्कृत करून राजकीय संदेश देणे म्हणजे स्वतःचा चेहरा वाचवणे. भुजबळ यांना ठाऊक आहे की त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, म्हणूनच त्यांनी बहिष्काराचा खेळ करून स्वतःला बळी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जनतेला आता हे डावपेच समजतात. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी खरी लढाई हवी, नुसत्या बातम्यात टिकून राहण्यासाठी धमक्या देण्याला काही अर्थ नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मोदींवर टीका, पण सत्य वेगळं! शांघाय सहकार संघटनेच्या बैठकीत पंतप्रधान मोदी हिंदीत बोलले, पुतिन रशियन भाषेत बोलले आणि शी जिनपिंग चिनी भाषेत बोलले. कुणीही पुतिनला इंग्रजी न बोलल्याबद्दल अशिक्षित ठरवलं नाही, कुणीही शीची थट्टा केली नाही. पण काँग्रेस समर्थक ट्रोलर्स मात्र मोदींवर हसले, त्यांना इंग्रजी न बोलल्याबद्दल अशिक्षित ठरवलं. ही मानसिक गुलामगिरीचं लक्षण आहे. आपल्या भाषेत अभिमानाने बोलणं म्हणजे आत्मविश्वास, परकीय भाषेत दबावाखाली बोलणं म्हणजे कनिष्ठतेची जाणीव. दुर्दैव इतकंच की देशावर वारंवार परकीय आक्रमण होऊ शकलं ते आपल्या घरातीलच देशद्रोही वृत्तीमुळे. जे स्वतःच्या संस्कृतीवर विश्वास ठेवत नाहीत, ते इतरांवर उपहास करून स्वतःला श्रेष्ठ मानतात. इंग्रजी नव्हे, तर भारतीयत्व हेच आपलं सामर्थ्य आहे—हे सत्य विसरणाऱ्यांनी इतिहास पुन्हा वाचावा.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
फडणवीसांची मुत्सद्देगिरी ठसठशीत ! मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने विरोधकांना फडणवीस अडचणीत येतील अशी अपेक्षा होती, पण उलट खेळ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय पटावरील चालांनी सर्वांना चारीमुंड्या चित्त केले. जरांगे पाटील यांच्या जवळील उपमुख्यमंत्री शिंदेंची सद्दी त्यांनी नामोहरम केली, तर छत्रपती संभाजीराजेंचे महत्त्व कमी केले. शिवेंद्रराजेंना पहिल्यांदाच मोठ्या फ्रेममध्ये आणून मराठा चेहरा पुढे केला. दुसरीकडे माणीकराव कोकाटे यांची प्रतिमा उजळवत अजित पवार गटावर टोलाही बसवला. राधाकृष्ण विखेंच्या माध्यमातून मराठा समाजाला विश्वासात घेत मुत्सद्देगिरी दाखवली. समाजास आश्वासने मिळाली—वंशावळ नोंदी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, वारसांना नोकरी. परंतु खरी कमाल म्हणजे आंदोलन आटोक्यात ठेवून समाजात आशेची नवी किरणे दाखवली. विरोधक गोंधळले आणि फडणवीस पुन्हा एकदा विजयी ठरले.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
खोट्या अफवा, पण सत्य वेगळं ! देशद्रोही विरोधक आणि त्यांच्या ट्रोल सेनेने सोशल मीडियावर अफवा पसरवली की चीनच्या विजय दिन परेडमध्ये मोदींना बोलावलं नाही. पण सत्य अगदी वेगळं आहे. चीनच्या ८० व्या विजय दिन परेडमध्ये पाकिस्तान, रशिया, इराण, कोरिया, नेपाळसह २६ देश सहभागी झाले होते. भारत मात्र ठाम राहिला—कारण आपला नियमच आहे की चीन-जपान युद्धातील विजय परेडमध्ये भारत भाग घेत नाही. हा कार्यक्रम चीनच्या दाव्याला मान्यता देतो, तर जपान त्या दाव्याला नाकारतो. भारत आणि जपान यांचे निकटचे मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेता पंतप्रधान मोदींनी चीनकडे जाण्याआधी जपानला भेट दिली आणि नंतर केवळ एससीओ परिषदेत सहभागी झाले. विरोधकांना हे माहीत असूनही ते खोटं पसरवतात, हेच त्यांच्या देशद्रोही वृत्तीचं उदाहरण आहे. वस्तुस्थिती अशी की हा निर्णय मोदींच्या राजनयिक मुत्सद्देगिरीचा आणखी एक ठळक पुरावा आहे.
🔽
#AbhijeetRane #PoliticalAnalysis #FadnavisLeadership #MarathaReservation #JarangePatil #ChhaganBhujbal #ModiDiplomacy #IndianPride #FakeNarratives #TruthPrevails #MumbaiMitra





Comments