top of page

 अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Aug 4
  • 3 min read

 अभिजीत राणे लिहितात

 राज ठाकरेंसारखे नेते मराठी माणसाला भडकवून देतात मग मराठी माणूस भडकतो. अन मग आमच ह्याव अन आमचं त्याव करायच्या नादात विकासाला अड्सर करतो. ताज उदाहरण हिंजेवाडीच आहे. हिंजेवाडी रोड ला ट्राफिक जाम होत असताना तेथील ट्राफिक वर उपाययोजना करायला निघालेल्या सरकारला हिंजेवाडीचे ग्रामस्थ सरपंच सहकार्य करत नाहीये अन त्यामुळे तेथील अड्सर दूर होत नाहीये. त्यामुळे स्वतः अजित दादा तिथे गेले असतानाही तेथील सरपंच व ग्रामस्थ सहकार्याला तयार नाहीत म्हणून दादा बोलले की सगळं वाटुळं होणार आहे तुमच्या मुळे सगळ्या कंपन्या बाहेर जाणार यामुळे, तरी देखील तो सरपंच उद्दामपणे चं बोलत होता. अशा लोकांना उचकवण्यात या राज ठाकरे सारख्या लोकांचा हातभार आहे. मुंबईचे वाटोळे करून झाल्यावर आता राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावण्याचे ठरवलेले दिसत आहे. स्वतःचे दुकान चालत नाही म्हणून इतरांचे पण दुकान बंद करण्याचे हे उद्योग आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांनी ही प्रवृत्ती मतदान करताना ठेचून काढणे आवश्यक आहे.

 अभिजीत राणे लिहितात

 राहुल गांधी यांना त्यांचा पाय गाळात जाताना दिसतो आहे आणि त्यामुळे ते पातळी सोडून टीका करत आहेत. दोन प्रकरणे त्यांच्या विरोधात प्रलंबित आहेत आणि दोन्हीचा निकाल विरोधात जाणार याची त्यांना खात्री आहे म्हणून आता टीका करून व्हीक्टिम कार्ड खेळायचा त्यांचा प्रयास सुरू आहे. राहुल गांधीने गेल्या काही दिवसात निवडणूक आयोगावर नुसते बेफाम आरोप च केले नाहीत,तर निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांना वारंवार धमकीसुद्धा दिली आहे की त्याच्या आरोपा नुसार त्यांनी निवडणुका घेण्यात जे घोटाळे केले आहेत,त्याची सजा तो त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही,अगदी ते अधिकारी निवृत्त झाल्यावर सुद्धा. आता या नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक घोटाळा केल्याच्या आरोपावर जामीनावर असलेल्या राहुलला तुरुंगात जाण्याहकी भीती आहे. दुसरे प्रकरण आहे ब्रिटिश नागरिकत्वाचे हे प्रकरण उघड झाले तर त्याक्षणी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होणार आणि ते घडू नये म्हणून निवडणूक आयोगाला धमकावणे सुरू आहे. दुसरीकडे तुरुंगात जावे लागले तर सहानुभूती मिळावी म्हणून मोदींवर विकृत भाषेत टीका सुरू आहे.

 अभिजीत राणे लिहितात

 2025 च्या जुलैमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेवर एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. त्यात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल जागतिक नाणेनिधी ने म्हटले आहे की ६.४% टक्क्याने सकल घरेलू उत्पादन वाढेल. २०२६ला सुद्धा हाच दर असेल. आणि त्या उलट जगावर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेला नाणेनिधीने आरसा दाखवला आहे. कर्जबाजारी असलेल्या अमेरिकेचा जी डी पी 2025 मध्ये फक्त 1.9% वाढ आणि तेच 2026 मध्ये केवळ 2.0% वाढण्याचा अंदाज आहेत. अर्थात एका रेंगाळत्या कुबडाधारी म्हाताऱ्यासारखी भरकटलेली अमेरिकेची अर्थव्यवस्था भरकटलेलीच असणार आहे. ट्रंप कितीही वल्गना करत असला तरी ब्रिक्स मधील सगळ्याच राष्ट्रांची अर्थव्यवस्था विस्तारत आहे. त्यात चीन आणि भारत तर पाश्चिमात्य राष्ट्रांना भय वाटेल या वेगाने वाढत आहेत आणि दुसरीकडे यूरोपियन राष्ट्रे आणि अमेरिकेला आपल्या अर्थव्यवस्थेचा होणार संकोच हादरवणारा सिद्ध होतो आहे. ट्रंप यांचे भारतावर राग राग करण्याचे हे सुद्धा कारण आहे.

 अभिजीत राणे लिहितात

देशातील राजकारण सध्या एका विचित्र संक्रमणातून जात आहे. एकीकडे नरेंद्र मोदींचं नेतृत्व तिसऱ्या कार्यकाळाच्या दिशेने अधिक मजबूत होताना दिसतंय, तर दुसरीकडे विरोधकांचा मोर्चा सैरभैर झाल्यासारखा भासत आहे. राहुल गांधी प्रणित काँग्रेस आणि भाजपमधील अंतर्गत मोदीविरोधी शक्ती अनेक स्तरांवर पाऊल टाकतात, पण ठोस परिणाम नोंदवता येत नाही. डावपेच बदलतात, रणनीती नवी होते, पण उभय विरोधकांचे हात मात्र रिकामेच राहतात.या पार्श्वभूमीवर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते; गांधी कुटुंबाने काँग्रेसमधून प्रत्यक्ष संन्यास घेतल्याशिवाय देशाच्या सत्तास्थितीत मूलभूत बदल घडू शकणार नाही. गांधी कुटुंब आजही काँग्रेसच्या सूत्रांवर नियंत्रण ठेवतं, पण ना ते निवडणूक जिंकून खासदारांचा निर्णायक आकडा गाठू शकतात, ना विद्यमान खासदारांमध्ये फूट पाडू शकतात. काही नागरिकांना मोदी यांना पर्याय हवा आहे, पण तो काँग्रेसमध्ये दिसत नाही. भाजपमधील नाराज गटही आज "ठोस पर्याय" म्हणून समोर येत नाहीत. सत्तेतील नेतृत्व अधिक स्थिर, तर विरोधक अधिक हतबल भासत आहेत.

 अभिजीत राणे लिहितात

तमिळनाडूतील अरियल्लूर जिल्ह्यात वसलेल्या गंगाईकोंडा चोलापुरम मंदिराला २७ जुलै २०२५ या दिवशी पंतप्रधान मोदींनी भेट दिली. १००० वर्षांपूर्वी महापराक्रमी राजेंद्र चोल (जन्म ९७१ - मृत्यू १०४४) राजाने या मंदिरात गंगेचं पाणी आणून या मंदिरातील कुंडात त्याची स्थापना केली आणि महादेवाच्या मूर्तीवर त्याचा अभिषेक केला होता. या कृतीमधून एकापरीने त्याने संपूर्ण भारताच्या एकात्मतेचा संदेशही दिला होता.आज तब्बल १००० वर्षांनी पुन्हा एकदा गंगेचं पाणी आणून त्याची त्याच कुंडात पुनर्स्थापना करणारा आणि महादेवाची मूर्ती त्या पाण्याने अभिषिक्त करणारा दुसरा राज्यकर्ता म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी हाच असावा हा एक अपूर्व योग आहे. पारंपरिक तमिळ वस्त्रं परिधान करून मोदींनी मूर्तीची महापूजा सुद्धा केली आणि एकूण दोन तास त्यांनी त्या मंदिरात व्यतीत केले. संपूर्ण तमिळनाडूमध्ये मोदींच्या या उपक्रमामुळे सनातनप्रेमाची सुनामी उसळली आहे. उलट आजपर्यंत या मंदिराकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या द्रमुक नेत्यांचं मात्र तिकडे धाबं दणाणलंय. पुढल्या वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकांवर याचा भयंकर परिणाम होईल अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे.

ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page