top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jul 31
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

सध्याच्या काळात रसायनांचा मारा केलेले अन्न आणि आधुनिक जीवनशैली यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असतानाच एक दिलासा देणारी बातमी ब्रिटन मधून आली आहे. इंग्लंडने नुकतीच अशा एका इंजेक्शनच्या वापराला मंजुरी दिली आहे, जे १५ वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगांवर मात करू शकते, ज्यामध्ये स्तन, फुफ्फुस, त्वचा आणि स्वादुपिंडाचा कर्करोग यांचा समावेश आहे. ही उपचारपद्धत शरीराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीला जागृत करते ज्यामुळे आपल्या श्वेतपेशी कर्करोगाच्या पेशींना ओळखून नष्ट करू शकतात.हे इंजेक्शन वैयक्तिक प्रतिकारशक्तीवर आधारित उपचार या नव्या संकल्पनेचा भाग आहे, ज्यामध्ये रुग्णाच्या शरीराला आपल्या निरोगी पेशींना बाधित न करता कर्करोगाशी लढण्याची प्रेरणा दिली जाते. प्रारंभिक चाचण्यांमध्ये असे दिसून आले की या उपचारामुळे ट्यूमरच्या आकारात लक्षणीय घट झाली आणि पुढील टप्प्यातील रुग्णांचे जीवनमान वाढले.यामुळे एकाच उपचारपद्धतीने अनेक प्रकारच्या कर्करोगांवर मात करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्लेग , पोलियो प्रमाणे आता कर्करोग सुद्धा संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भारत रशियाकडून तेल खरेदी करतो आहे म्हणून डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर 1 ऑगस्ट पासून 25 % टेरिफ लावण्याची घोषणा केली आहे. भारत सरकारने याला 4 परिच्छेदात उत्तर दिलंय. पहिल्या परिच्छेदात स्पष्ट म्हटलं आहे की आम्ही ट्रम्प यांच्या द्विपक्षीय व्यापाराबद्दलच्या विधानाची नोंद घेतली आहे. त्याच्या परिणामांचा आम्ही अभ्यास करत आहोत. दुसऱ्या परिच्छेदात म्हटलंय की, भारत आणि अमेरिका गेले काही महिने, एका न्याय्य, संतुलित आणि एकमेकांना किफायतशीर होईल, अशा द्विपक्षीय व्यापारी करारावर काम करत आहेत. ट्रम्प यांनी लावलेला टेरिफ हा एकतर्फी आहे. आम्हाला स्वीकारता न येण्यासारखा आणि मुख्य म्हणजे किफायशीर बिलकुल नाही. तिसऱ्या परिच्छेदात सरकारने असं म्हटलं आहे की, आमचे शेतकरी, आमचे मोठे उद्योजक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक यांचं हित जपणं आणि जोपासणं ही आमची अत्युच्च प्राथमिकता आहे.चवथ्या परिच्छेदात असही म्हटलं आहे की, भारत सरकारने केलेल्या इतर व्यापारी करारा प्रमाणेच, इथेसुद्धा आपल्या राष्ट्राच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना भारत सरकार करेल. थोडक्यात, भारताच्या हिताच्या आड येणाऱ्या कोणत्याही अटी, शर्ती, यांना भारत सरकार धूप घालणार नाही. किंवा अशा कोणत्याही एकतर्फी टेरिफ्स, किंवा कर यांना भारत योग्य त्या भाषेत आणि कृतीने उत्तर देईल. हे आहे ट्रम्पच्या टेरीफला मोदी स्टाईल उत्तर !!

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

तळोजा इथे अदाणी यांच्या प्रकल्पाला 400 एकर जमीन सवलतीच्या दरात दिली म्हणून महाराष्ट्रातील अक्कलशून्य मीडियाने परत एकदा गदारोळ सुरू केला आहे. एम आय डी सी मधील मोठे भूखंड हे मोठ्या प्रकल्पांना अत्यंत सवलतीच्या दरातच दिले जातात कारण त्यातून त्या मोठ्या उद्योगाच्या जोडीला अनेक छोटे उद्योग निर्माण होतात आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. एम आय डी सी ची स्थापनाच त्यासाठी झाली आहे. आजचे छत्रपती संभाजी नगर त्यावेळी औरंगाबाद होते तिथे बजाज कंपनीला 277 एकर जमीन 1 रुपयात दिली होती. सध्याचे पत्रकार म्हणजे गिधाडे झाली आहेत. त्यांचे पोशिंदे सत्तेबाहेर असल्याने त्यांना वाट्टेल त्या बातम्या छापून सरकारविरोधी मत निर्माण करायचे आहे. परंतु यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते याची सुद्धा त्यांना पर्वा नाही. या 400 एकर जमिनीवर ₹ 83947 कोटींचा प्रकल्प, 5000 हून अधिक नोकर्‍या, आणि भारतातील पहिला फुल स्केल सेमीकंडक्टर फॅब येणार आहे. सेमी कंडक्टर तंत्रज्ञान ही भविष्याची गुरुकिल्ली आहे असा प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी सवलतीच्या दरात जमीन देणे काहीच गैर नाही पण ही अक्कल आपल्या मीडियाला नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

नवीन मुसलमान अधिक जोरात बांग देतो अशी आपल्याकडे एक म्हण आहे. नवीन नवीन सेक्युलर झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे बघितले की हे अधिकच प्रकर्षाने जाणवते. पहलगाम हल्ल्याच्या दिवसापासून आजपर्यंत कोंग्रेस आणि शिवसेना उबाठा गट हे दोघेही एकाच सुरात बोलत होते. आणि हा सुर भाजपा विरोधाच्या नादात देशविरोधी झाला होता आणि दोघांनाही त्याची पर्वा नव्हती. असे वागल्याने आपल्याला मुस्लिमांची मते मिळतील हा अत्यंत वेडा समज या पक्षांचा झाला आहे. भारतातील मुसलमान कसा विचार करतो हे ओवेसी यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्यासाठी कोंग्रेस आणि उबाठा यांचे जे हिडीस प्रकार चालले आहेत त्यामुळे प्रत्येक देशभक्त नागरिक संतापला आहे. ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्यात नरसंहार करणारे आरोपी सैन्याने मारून टाकले. त्यावर उबाठासेनेचे पडेल उमेदवार राजन विचारे महाशय म्हणतात अतिरेकी मारले म्हणजे उपकार केले का ? विचारे महाशय तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आगामी निवडणुकीत ठाण्याची जनता देईल त्यावेळी ईव्हीएमच्या नावाने रडू नका.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राजकीय अभिनिवेश आणि राजकीय पक्षांच्या प्रती ममत्व बाळगून काम करणार्‍या आणि व्यक्त होणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना देवेंद्रजी फडणवीस यांनी वेसण घातली आहे. सामान्य प्रशासन विभागाने एक जी आर काढला आहे त्यानुसार शासकीय नोकरांनी ज्यांना राजकारण करायचं असेल तर त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारण करावे! शासनाची पगार घेत असलेला कोणताही नोकरदार यांच काम आहे जनतेची सेवा करने.. शासकीय नोकर म्हणजे सरकार आणि जनतेमधील दुवा आहे. शासनाने केलेली कामे/निर्णय जनतेपर्यंत पोहचवणे प्रशासनाचे काम असतो. जर सरकार विरोधी द्वेष भावना मनात बाळगून खोटी माहिती, भ्रामक गोष्टी , चुकीच्या पोस्ट लिहत असाल, पोस्ट करत असाल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल! जर एखादा सरकारी कर्मचारी काम कमी, उचापती जास्त करत असेल तर त्याच्यावर तत्काल कारवाई केली जाईल असा सज्जड दमच देवेन्द्रजींनी दिला आहे.

🔽

ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page