🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jul 30
- 3 min read
Updated: Jul 31
🖋️ अभिजीत राणे लिहितात
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नक्की कसा आणि किती विकास केला याची आकडेवारी पाहून घ्या. आज महाराष्ट्र ही 536 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था आहे भारताच्या जी डी पी मध्ये महाराष्ट्राचा 13.7 % वाटा आहे. या आकड्यांचं महत्त्व तेव्हा वाढतं, जेव्हा आपण पाहतो की बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव या सर्व दक्षिण आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांच्या एकत्रित आकारापेक्षाही हा आकडा अधिक आहे. या देवेन्द्रजींची कमाल काय ? 2013 - 14 ला महाराष्ट्राचा जी डी पी फक्त 11 लाख कोटी एवढा होता तो आता तो तब्बल 44 लाख कोटी आहे 2014 ते 2025 या कालखंडातील मधली अडीच तीन वर्षे वगळली तर देवेंद्रजी सत्तेच्या केंद्रस्थानी होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी त्यामागील मास्टर माइंड आणि योजक देवेंद्रजी होते हे सत्य एकनाथजी सुद्धा मान्य करतील. म्हणूनच आपल्याकडे म्हणतात “योजकस्य तत्र दूर्लभः “
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कोणत्याही राज्यातील पायाभूत विकास हाच त्या राज्याच्या आर्थिक प्रगतीचा वेग वृद्धिंगत करू शकतो. देवेंद्रजी फडणवीस यांनी 2014 मध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली, तेव्हा केवळ घोषणा आणि फायलींमध्ये अडकलेले अनेक प्रकल्प प्रत्यक्षात उतरवले गेले. मुंबई मेट्रो (356 किमी), ट्रान्स हार्बर लिंक (21.8 किमी), समृद्धी महामार्ग (701 किमी), नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑक्टोबरमध्ये 2025 मध्ये कार्यान्वित होणार आहे. नागपूर, पुणे मेट्रो, फ्लायओव्हर, रिंगरोड, शहरांतील सीवेज ट्रीटमेंट प्रकल्प, वाढवण बंदर या सर्व प्रकल्पांमागे केवळ यंत्रणाच नव्हती, तर राजकीय इच्छाशक्ती, धोरण स्पष्टता आणि वित्तीय नियोजन होतं. हे प्रकल्प महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोठा हातभार लावणार आहेत. “आम्ही प्रकल्पांचे आरेखन करतो, कार्यान्वित करतो आणि राष्ट्राला समर्पित सुद्धा करतो.” ही देवेन्द्रजींची घोषणा त्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
काल भारताचे परराष्ट्रमंत्री एस् जयशंकर यांनी लोकसभेत निःसंदिग्ध शब्दांत सांगितले की ज्या दिवशी पहलगाम हत्याकांड घडले त्या दिवशी म्हणजे २२ एप्रिल,२०२५ रोजी त्यांना त्या हत्याकांडामुळे वाटलेले दुःख पंतप्रधानांकडे व्यक्त करण्यासाठी आणि १७ जून २०२५ रोजी पंतप्रधान कॅनडामध्ये असताना आपण अमेरिकेत परत गेल्यामुळे भेटू शकत नाही हे त्यांना सांगण्यासाठी असे फक्त दोन वेळा च अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते.त्या दोन तारखांच्या मधल्या काळात अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकदा ही संभाषण झालेले नाही.याचा अर्थ १०मे रोजी भारत पाकिस्तान युद्धात जी युद्धबंदी झाली ती माझ्या मध्यस्थीमुळेच हा ट्रम्प यांचा दावा खोटा आहे हे स्पष्ट होते.याचा अर्थ हा सुद्धा की राहुल गांधी नरेंदर. सरेंडर. वगैरे जे काही बरळत होता ते नेहमीप्रमाणे खोटेच निघाले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
ऑपरेशन सिंदूर वर संसदेत चर्चा सुरू असताना सोलापूरच्या खासदार आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सुकन्या प्रणिती हिने जे भाषण केले आहे त्यामुळे फक्त सोलापूरकरांची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची मान लज्जेने खाली गेली आहे. आपल्या भाषणात प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख तमाशा असा केला. हा सैन्य दलांचा , शास्त्रज्ञांचा आणि संपूर्ण देशाचा अपमान आहे. प्रणिती शिंदे यांना जनाची नाही पण मनाची जरी असेल तर त्या देशाची माफी मागतील. ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानकडून भारतावर शेकडो ड्रोनचा , क्षेपणास्त्रांचा मारा झाला. त्यांच्या विमानांनी हल्ले केले आणि हे सगळेच्या सगळे हल्ले आपल्या हवाई सुरक्षा यंत्रणेने शतप्रतिशत निष्प्रभ केले. इतके उच्च कोटीचे तांत्रिक कौशल्य इस्रायलच्या आयर्न डोम आणि अमेरिकेच्या थाड प्रणालीकडे सुद्धा नाही हे नुकत्याच झालेल्या इराण इस्रायल युद्धात सिद्ध झाले आहे. परंतु भाजपा , मोदी द्वेषाने आंधळ्या झालेल्या कोंग्रेस पक्षाच्या नेत्यांना आपण आता देशद्रोहाच्या उंबरठ्यावर उभे आहोत हे सुद्धा उमजत नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्राची बेअब्रू करण्यात केवळ प्रणिती शिंदे यांनीच बाजी मारली नसून या स्पर्धेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मंडळी सुद्धा अग्रणी आहेत. अरविंद सावंत संसदेत विचारतात "पाकिस्तान विरोधातील हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर कां नाव दिलं?" संजय राऊत तर जेष्ठ खासदार आहेत, पत्रकार आहेत, दीर्घकाळ संपादक राहिले आहेत परंतु ते सुद्धा म्हणतात "ऑपरेशन सिंदूर हे फेल्युअर आहे." कमीत कमी त्यांनी परदेशातील मीडिया , आणि जागतिक संरक्षण तज्ञ या विषयावर काय बोलत आहेत याचा तरी अभ्यास करायचा होता ??? राजन विचारे हे माजी खासदार आहेत ते विचारतात "अतिरेकी मारले म्हणजे उपकार केले कां?” महाराष्ट्रातील नागरिकांनी खरोखर पूर्ण गांभीर्याने आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आपण नक्की कोणती बांडगुळे संसदेत पाठवत आहोत ??? हे लोक संसदेत जे काय बरळतात त्यामुळे त्यांची लायकी तर निघतेच पण महाराष्ट्रातील सामान्य मतदारांच्या विवेकाबद्दल संभ्रम निर्माण होतो आहे.
🔽












Comments